Thane dist @news
•दिनेश कांबळेंना गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार बहाल
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
ठाणे:ललित कला फाउंडेशन, ठाणे यांच्या वतीने आयोजित उभरते गझलकार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात मान्यवर परीक्षक मंडळाने दिनेश कांबळे यांची ‘गझलकार सुरेश भट या पुरस्कारासाठी’ एकमताने निवड केली होती. सदरहु पुरस्कार वितरण सन्मान सोहळ्याचे आयोजन ठाणे येथील एम. एच विद्यालयात दि. ७ जानेवारीला करण्यात आले होते.
त्यांना मान्यवरांच्या हस्ते दोन हजार रुपयांचा धनादेश, आकर्षक असे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले .
दोन सत्रांत गझल सोहळ्याचे (मुशायरा ) आणि एका सत्रात कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.उपरोक्त काव्यसोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गझलकार ,कवींनी ठाणे नगरीत आपली हजेरी लावली होती.
साहित्य सोहळ्याचे सूत्रसंचालनशिल्पा परुळेकर, यांनी आपल्या सदाबहार शैलीत केले .तर, गझल मुशायरा सूत्रसंचालन अंजली दीक्षित आणि सोमिनाथ सोनवणे यांनी अतिशय सुरेखरित्या करुन सोहळ्यात अधिक रंगत भरली.
ललित कला फाउंडेशनचे हे या उपक्रमाचे प्रथम वर्ष होते. सदरहु फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप कारखाणीस यांनी आपल्या मनोगतात गझल प्रसार ,प्रचार होण्यासाठी संस्था कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.तदवतचं विजेत्यांचे अभिनंदन केले. या शिवाय जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे आणि संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनीही दिनेश कांबळे यांचे अभिनंदन केले.
कवि कांबळे यांना गझल लेखनासाठी यापूर्वीही ‘शब्दसुमने मंच मंगळवेढा’ तसेच ‘प्रज्ञा गझलमंच महाराष्ट्र’ या साहित्य संस्थेचा गझल लेखनासाठीच्या स्पर्धेत पुरस्कार मिळालेले आहेत. कांबळे हे मनातली काव्यअक्षरे साहित्य समूह महाराष्ट्र राज्य या साहित्याला समर्पित समूहाचे प्रशासक असून, साहित्य सारथी कला मंच पुणे शाखेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या साहित्यीक कारकिर्दीसाठी साहित्यीक मित्र परिवारांनी अभिनंदन त्यांचे केले आहे.