Chimur taluka@ news
• चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात.
– ११ ते २५ जानेवारी पर्यंत राबविणार अभियान
✍️ शार्दुल पचारे
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर:अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात केली असून ११ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे.
सध्या महाराष्ट्रात एसटी मध्ये सुमारे पंचवीस हजारच्या आसपास चालक कार्यरत आहेत. अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात झाली असून अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संभाजी शिंदे. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते. वाहतूक निरीक्षक सूरज मुन. अभियंता पराग अंबादे. पत्रकार जितेंद्र सहारे. राजकूमार चुनारकर. श्रीहरी सातपुते. वाहतूक नियंत्रक सुरेश नन्नावरे. आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरानी चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पठऊन देण्याबरोबरच उत्तम शरीर. प्रकुरति आणि मनस्वास्थ या चातूर्सुतरीचे पालन करण्याचे आव्हान चालकांना करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक होमराज सिडाम यांनी केले तर आभार नेहा मेश्राम यांनी केले