Home Breaking News Chandrapur dist @news • वन परिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयाच्या रोखलेखा खर्च...

Chandrapur dist @news • वन परिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयाच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी करा- मुरलीधर गायकवाड यांची मागणी

169

Chandrapur dist @news
• वन परिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयाच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी करा- मुरलीधर गायकवाड यांची मागणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर: जिल्ह्यातील वन परिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयाच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची एसटीआय व्दारे चौकशी करावी अशी मागणी
शिवणी येथील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी एक लेखी निवेदनातून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

उपरोक्त प्रकरणात
निःपक्षपाती व सखोल चौकशी झाल्यास अनेक गैरव्यवहार बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.दरम्यान ते लवकरच महसूल आयुक्त नागपूर यांची भेट घेवून त्यांना या बाबत निवेदन सादर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.याच प्रकरणाच्या अनुषंगाने सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचेकडे चौकशीची मागणी केली आहे.