Home Breaking News Chimur taluka@ news • दारु पिऊन फोनवर शिवीगाळ करण पडल महागात -चिमूर...

Chimur taluka@ news • दारु पिऊन फोनवर शिवीगाळ करण पडल महागात -चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

129

Chimur taluka@ news
• दारु पिऊन फोनवर शिवीगाळ करण पडल महागात -चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

✍️ शार्दुल पचारे
सुवर्ण भारत:चिमूर प्रतिनिधी

चिमूरः-केंद्र सरकारच्या ड्राइव्हर विरोधी काळ्या कायद्यात सध्या संपुर्ण भारतभर विविध पद्धतीने वाहन चालकांचे आंदोलन चालू आहे. त्याचे पडसाद चंद्रपुर जिल्ह्यात दिसुन येत आहे. मात्र जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद चांदेकर हे सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र ते निवेदनाच्या नावाने बियरबार मध्ये दारु पिताना दिसत आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. विनोद चांदेकर हे जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर आहेत. आपली जबाबदारी पार पाडायची म्हणुन शुक्रवार दि, 12 जानेवारीला सिंदेवाही येथे वाहन चालकाच चक्का जाम आंदोलन होत. त्या निमित्याने वरीष्ठ पदाधिकारी म्हणून विनोद चांदेकर यांना बोलविण्यात आले.

मात्र विनोद चांदेकर हे सिंदेवाही येथे आले असता निवेदन आंदोलन एकीकडे मात्र चांदेकर यानी सिंदेवाही येथील काही चालक घेऊन बियर बार मध्ये सोबत घेऊन दारु ढोकसत मोठमोठ्या गोष्ठी केल्या. काहिना दारु आगात आल्यावर आरोपी विनोद चांदेकर चंद्रपुर व पंकज जगन बडोत्री यांनी चक्क एक चालक प्रवीण वाघे नेरी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे ती अश्लील भाषेची शिवीगाळ अडीओ क्लिप शोशल मिडीयावर वायरल होताना दिसुन येत आहे. फिर्यादी प्रवीण वाघे यांनी चिमुर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध 504,506,507, अंतर्गत गुन्हा दाखल करन्यात आला आहे. पुढील तपास चिमुर पोलीस करत आहेत.