Ballarpur city@ news
• वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी कडून वाहन चालक मालक संघटनेला समर्थन
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
बल्लारपुर: संघर्ष वाहन चालक मालक संघटना बल्लारपूर साखळी उपोषण करण्याकरिता बसलेले चालक व मालक यांना वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडीने सविस्तर रित्या भेट देऊन त्यांच्यावर केंद्र सरकारने लादलेला कायदा हा काळा कायदा असून ते रद्द करण्यात यावा. याकरिता वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी तालुका व शहर तर्फे त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला व केंद्र सरकारने आणलेला जुलमी कायदा रद्द करण्यात यावा याकरिता केंद्र सरकारच्या जाहीर निषेध नोंदविला व समस्त चालक व मालक यांना जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला त्याकरिता वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर तालुका अध्यक्ष अभिलाष चुनारकर, उमेश कडू कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर, गौतम रामटेके तालुका महासचिव युवा आघाडी बल्लारपूर, अश्विन शेंडे जिल्हा सदस्य चंद्रपूर युवा आघाडी, सुदेश शिंगाडे जिल्हा सदस्य चंद्रपूर युवा आघाडी , प्रशांत सातकर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर, स्वप्निल दुधे शहर उपाध्यक्ष युवा आघाडी बल्लारपूर, दूरेश तेलंग ज्येष्ठ सल्लागार बल्लारपूर शहर वंचित बहुजन आघाडी, तसेच सरोज झाडे, धम्मपाल मून, मयूर लभाने, विश्वेश्वर आकनूरवार ,सम्यक रामटेके, राहुल वाळके, सुहास दुबे, हर्षल भसारकर, अभी दुर्गे, गजू मळावी, व तसेच वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.