Amravti dist@ news
• मोनिका इसाने यांनी केले 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र टीमचे प्रतिनिधित्व !
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
अमरावती:नेहरू युवा केंद्र अमरावती, खेल व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, यांच्या माध्यमातून विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या अचलपूर तालुक्यातील राष्ट्रीय युवा स्वयंसेविका कु. मोनिका राजेशराव इसाने यांनी महाराष्ट्र टीमचे नेतृत्व केले.
महाराष्ट्रातील नाशिक येथे दिनांक 12 जानेवारी ते 16जानेवारी पर्यंत या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.या वेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्य मंत्री निशित प्रामाणिक, भारती पवार, राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोड, पालकमंत्री दादाजी भुसे आदि मंत्र्यांनी सदरहु युवक महोत्सवाला भेट देत त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
देशभरातून 28 राज्य आणि 70 केंद्रशासित प्रदेशातून आलेल्या युवकांच्या कला व संस्कृतीचा आविष्कार या युवक महोत्सवात प्रत्यक्ष बघावयास मिळाला. या महोत्सवाच्या निमित्ताने बरीच माहिती युवक मंडळींना मिळाली. युवकांचा सर्वांगीण विकास,संस्कृती व परंपरा जतन करणे युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे हा एकमेव उद्देश या राष्ट्रीय महोत्सवाचा होता!उपरोक्त टीमचे नेतृत्व कु.मोनिका राजेशराव इसाने यांनी केले.
