Home Breaking News Chandrapur dist@ news • स्वत़ंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेचे रास्त...

Chandrapur dist@ news • स्वत़ंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेचे रास्त मागण्यांसाठी चंद्रपूरात एक दिवशीय धरणे आंदोलन!

103

Chandrapur dist@ news
• स्वत़ंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेचे रास्त मागण्यांसाठी चंद्रपूरात एक दिवशीय धरणे आंदोलन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर: सर्व शेतमालारील निर्यातबंदी हटवावी व शेतमाल व्यापारीवरील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा , स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती त्वरित करावी, वनजमीनीचे पट्टे देतांना वनकायद्यातील तीन पिढ्यांची अट व पंचविस वर्षांची एक पिढी ही अट काढून टाकण्यात यावी यासह अन्य दहा मागण्यांसाठी आज गुरुवार दि.१८जानेवारीला चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने दुपारी १२वाजता एक दिवशीय धरणे आंदोलन करुन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.राजूराचे माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे झुंजार नेते वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली आज चंद्रपूरात धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी व शेतकरी बांधव सहभागी झाले होते.संध्याकाळी एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना एक मागण्यांचे निवेदन दिले.