Home Breaking News Ballarpur city@ news • वंचित युवा आघाडी तर्फे संजय गांधी निराधार...

Ballarpur city@ news • वंचित युवा आघाडी तर्फे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतिल लाभार्थ्यांना पैसे देण्याची मागणी

33

Ballarpur city@ news
• वंचित युवा आघाडी तर्फे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतिल लाभार्थ्यांना पैसे देण्याची मागणी

✍️पारिश मेश्राम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर:वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदन देण्यात आले .
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना द्वारे प्रति माह मिळणारा भत्ता हा हा काही कालावधी पासून ३ ते ४ महिन्या पासून मिळाले नाही. त्यामुळे या योजनेचे लाभार्थी गोरगरीब व दिव्यांग व्यक्ती तसेच विधवा महिला घटस्फोटातील महिला व जेष्ठ नागरिक असे अनेक प्रकारचे लाभार्थी असे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींना अनेक आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच सदरहू व्यक्तीचे बरीच कामे या योजने अंतर्गत मिळणाऱ्या निधीवर अवलंबून असतात त्यामुळे त्यांचे राशन व औषध पाणी व जीवना आवश्यक इतर खर्च भागवण्यासाठी या योजनेचे पैसे वेळेवर मिळणे गरजेचे आहे.

वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूरच्या वतीने या निवेदनाद्वारे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेद्वारे मिळणारे प्रति माह पैसे लाभार्थ्यांना वेळेवर देण्यात यावे व लाभार्थ्यांना होणारा मानसिक त्रास दूर करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी , वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी ओम मधुकर रायपुरे शहराध्यक्ष,अभिलाष चूनारकर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर, गौतम रामटेके तालुका महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर,अश्विन शेंडे वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा सदस्य चंद्रपूर, दुरेश तेलंग शहर सल्लागार वंचित बहुजन आघाडी, शुभम नागापुरे शहराध्यक्ष युवा आघाडी, मयूर वानखेडे तालुका सदस्य, राहुल वाळके, सोहन वनकर, निर्दोष वाळके, शुभम सोनटक्के, गौतम लोणारे तसेच वंचित बहुजन आघाडी ,वंचित बहुजन युवा आघाडी चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते