Home Breaking News Chandrapur dist@ news • आदर्श चंदनखेड्यात उत्साहात पार पडली १६००...

Chandrapur dist@ news • आदर्श चंदनखेड्यात उत्साहात पार पडली १६०० मिटर मॅराथॉन स्पर्धा ! • नेहरू युवा केंद्र चंद्रपूरसह अन्य सामाजिक व क्रीडा मंडळांचा उपक्रम !

101

Chandrapur dist@ news
• आदर्श चंदनखेड्यात उत्साहात पार पडली १६०० मिटर मॅराथॉन स्पर्धा !
• नेहरू युवा केंद्र चंद्रपूरसह अन्य सामाजिक व क्रीडा मंडळांचा उपक्रम !

चंद्रपूर:किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज़)

चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील आदर्श गांव म्हणून ओळख असलेल्या चंदनखेडा येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने राष्ट्रीय युवा सप्ताहचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमाच्या अनुषंगाने विविध स्पर्धा घेण्यात येत आहे याच निमित्ताने आज शनिवार दि.२० जानेवारीला चंदनखेड्यात नेहरु युवा केंद्राचे माजी तालुका समन्वयक आशिष हनवते यांच्या प्रमुख उपस्थितीत १६०० मिटर मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. सदरहु मॅराथॉन स्पर्धेसाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, सरपंच नयन जांभुळे, पोलिस पाटील समिरखान पठाण, नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत पुनवट संजय ब्राह्मणकर, नंदकिशोर जांभुळे, मोहित शेंन्डे आदिं उपस्थित होते.दरम्यान ही स्पर्धा बघण्यासाठी व भाग घेण्यासाठी अनेक युवा मंडळी व स्पर्धक उपस्थित झाले होते.आयोजित स्पर्धेत वरोरा तालुक्याच्या भिवकुंड येथील गोपाल गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, वरोरा तालुक्यातील सातारा येथील इंद्रजित भरडे याने व्दितीय क्रमांक मिळविला तर भद्रावती तालुक्यातील चरूर (धारापुरे) येथील अमर विनायक श्रीरामेने तृतीय क्रमांक प्राप्त केला . मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शौर्य क्रीडा मंडळाचे शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, कुणाल ढोक, विजय खडसंग,भुपेश निमजे,प्रविण भरडे, मंगेश झिंगरे,दिलिप ठावरी, शंकर दडमल, प्रज्वल बोढे,विवेक डुकसे,अनिकेत डुकसे,सुरज भोयर, आशिष बारतीने, गोलु गुरुनुले,वैभव भरडे यांचे विशेष सहकार्य लाभले.