Home Breaking News Chandrapur dist@ news • रास्त मागण्यांसाठी कोरपना येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस...

Chandrapur dist@ news • रास्त मागण्यांसाठी कोरपना येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आंदोलन सुरूच! • येत्या २५ जानेवारीच्या जेलभरो आंदोलनात अंगणवाडी सेविका व मदतनीस होणार सहभागी!

169

Chandrapur dist@ news
• रास्त मागण्यांसाठी कोरपना येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आंदोलन सुरूच!
• येत्या २५ जानेवारीच्या जेलभरो आंदोलनात अंगणवाडी सेविका व मदतनीस होणार सहभागी!

चंद्रपूर:किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज़)

राज्यभर विविध रास्त मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे गेल्या ५०दिवसांपासून बेमुदत काम आंदोलन सुरूच असून या आंदोलनाचा एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी देखील या कामबंद आंदोलनात भाग घेवून तहसिल कार्यालय परिसरात ठिय्या बंद आंदोलन आरंभ केले आहे.येत्या २५जानेवारीला चंद्रपूर शहरात भव्य मोर्चा निघून जेलभरो आंदोलन होत आहे.या आंदोलनात कोरपना तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी होत असल्याचे कल्पना मांदाडे यांनी आमच्या प्रतिनिधीस आज सांगितले.दरम्यान सुरू असलेल्या त्यांच्या ठिय्या आंदोलनाला पुरोगामी विचार मंच यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.