Home Breaking News Chandrapur dist@ news • “त्या” वनकामगारांना सेवेत कायम करा -दत्तात्रय समर्थ यांनी...

Chandrapur dist@ news • “त्या” वनकामगारांना सेवेत कायम करा -दत्तात्रय समर्थ यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

325

Chandrapur dist@ news
• “त्या” वनकामगारांना सेवेत कायम करा -दत्तात्रय समर्थ यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज़)

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पुसद येथे रोजंदारीवर कार्यरत असणाऱे वनकामगार रमाशंकर राममनोहर शुक्ला बाबू मधव शेळके, प्रकाश मैनाजी खंदारे, वामन महादू इंगोले, सिताराम गोपाळ राठोड,मोहन रतन राठोड व हरीभाऊ विठ्ठलराव पुजारी यांना सेवेत कायम करा अशी मागणी सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा औद्योगिक काँग्रेस सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे मार्फत एका लेखी निवेदनातुन नुकतीच केली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हे वनकामगार वनविभागात कार्यरत असून त्यांच्या रास्त मागणी कडे आपण स्वतः लक्ष पुरवावे असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे अन्य पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.