Home Breaking News Chandrapur dist @news • सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती...

Chandrapur dist @news • सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है….अश्या गगनभेदी घोषणा देत हजारों अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर,व गटप्रवर्तकांचा निघाला चंद्रपूरात विराट मोर्चा • भव्य मोर्चाने वेधले अनेकांचे लक्ष ! •जिल्हा परिषद समोर महिला कर्मचाऱ्यांनी केले जेलभरो आंदोलन !

193

Chandrapur dist @news
• सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है….अश्या गगनभेदी घोषणा देत हजारों अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर,व गटप्रवर्तकांचा निघाला चंद्रपूरात विराट मोर्चा
• भव्य मोर्चाने वेधले अनेकांचे लक्ष !
•जिल्हा परिषद समोर महिला कर्मचाऱ्यांनी केले जेलभरो आंदोलन !

चंद्रपूर: किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज)

सरकार हमसे डरती है!पुलिस को आगे करती है, एक रुपयाचा कढी पत्ता शासन झाले बेपत्ता अश्या घोषणा देत आज गुरुवारी दुपारी १२:३०वाजता स्थानिक गांधी चौकातील मनपा कार्यालयाच्या प्रांगणातून चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गटप्रवर्तक व मदतनीस यांचा विराट मोर्चा निघाला सदरहु मोर्चाचे नेतृत्व सिआयटीयूचे दिग्गज नेते काॅ.रमेशचंद्र दहीवडे यांनी केले.आजच्या या भव्य मोर्चाने चंद्रपूरकरांसह शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.गेल्या काही दिवसांपासून राज्यस्तरावर उपरोक्त कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून शासनाने त्यांच्या रास्त मागण्यांची अद्याप दखल घेतली नाही.परिणामे राज्य शासनास जागे करण्यासाठी आज सिआयटीयूच्या वतीने विराट मोर्चा व जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील हजारों महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.मुख्य मार्गाने निघालेल्या मोर्चाने अनेकांचे लक्ष वेधले होते.तर हा विराट मोर्चा बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली होती.अंगणवाडी सेविकांना २६ हजार रुपये वेतन तर मदतनीस यांना २०हजार रुपये वेतन मिळावे तदवतचं ग्रॅज्युटी व पेंशन लागू करावी या शिवाय आशा वर्कर यांना दोन हजार रुपये दिवाळी बोनस, सात हजार रुपये मानधन वाढ व सरसकट कामाचा मोबदला देण्यात यावा ह्या त्यांच्या प्रमुख रास्त मागण्या आहेत.दुपारी १२:३०वाजता निघालेला हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयासमोर दुपारी दोन वाजता शासनाविरोधी घोषणा देत धडकला .या वेळी चंद्रपूर जिल्हा परिषद प्रवेश व्दाराजवळ चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.याच ठिकाणी आंदोलन कर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले
तदंपूर्वि काॅ.रमेशचंद्र दहीवडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. जो पर्यंत शासन आमच्या मागण्यां पूर्ण करत नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील असे काॅ . रमेशचंद्र दहीवडे प्रसार माध्यमांशी बोलताना या वेळी म्हणाले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शोभा राहुलकर, शारदा लेनगुरे,संध्या खनके, सुरेखा तितरे, परविन शेख, रेखा महाजन, जिजाताई भांडेकर, कांता दखने, प्रेमिला बेंदले, प्रेमिला जगताप, माधुरी कवासे, माया कांबळे, अल्का नळे, वंदना जीवने, प्रियंका वनकर,विमल गावंडे , राधा सुकुंरवार, उज्वला पाटील सुषमा बेले , वंदना सुर्यवंशी सायली बावणे, अर्चना गिरसावळे, वंदना बळवाईक संगिता डोर्लीकर, सीमा वनकर , वनमाला भगत , गीता गोहणे, छाया कुमरे, भारती फाले ,शोभा कुरेकर आदिंनी अथक परिश्रम घेतले.शहरातील कायदा शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून पोलिस प्रशासनाने शहराच्या मुख्य मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.