Home Breaking News Chandrapur city@ news • ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची हत्या , चंद्रपूरात उडाली...

Chandrapur city@ news • ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची हत्या , चंद्रपूरात उडाली खळबळ ! • जमावाने केली आरोपीच्या वाहनाची तोडफोड!

60

Chandrapur city@ news
• ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची हत्या , चंद्रपूरात उडाली खळबळ !
• जमावाने केली आरोपीच्या वाहनाची तोडफोड!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील सरकारनगर वार्डातील ठाकरे गट युवासेनाचे शहर प्रमुख शिवा वझरकर यांची अमानुषपणे काल रात्री हत्या करण्यात आली.त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मृतक व आरोपी यांच्यामध्ये काही वाद झाला होता, त्याबाबत बोलण्याकरिता मृतक आरोपीला भेटायला गेला होता, बोलण्यातून वाद वाढत गेला, दरम्यान युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांच्या पोटात धारदार शस्त्राने हल्ला केला, त्या हल्ल्यात शिवा वझरकर हे जागीच ठार झाले.मृतक
शिवा हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.असे चौकशीअंती कळले.उपरोक्त घटनेची पोलिस चौकशी करीत
आहे.तदवतंच
या प्रकरणातील फरार आरोपीचा पोलिस कसून शोध घेत आहे.सदरहु
घटनेनंतर पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु, या शिवाय बल्लारपूर, घुग्घुस, भद्रावती व चंद्रपूर येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.