Chandrapur dist@ news
• संविधान सन्मानार्थ चंद्रपूरात निघाली भव्य बाईक रॅली !
चंद्रपूर:किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज़)
भारतीय संविधानाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने मान्यता दिली. हे संविधान 26 नोव्हेंबर 1950 ला प्रत्यक्ष स्वीकृत केल्या गेले. भारतीय संविधान हे मानव मुक्तीचा खरा आणि अमूल्य असा दस्ताऐवज आहे. म्हणून हजारों वर्षांच्या गुलामी नंतर भारतीय जनतेसाठी खऱ्या अर्थाने 26 जाने 1950 हा मानव मुक्ती दिन आहे.
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता, धर्मनिरपेक्षता या मानवीय मुल्याना वाढवून, भारताची एकता व एकात्मता अधिक मजबूत करण्या ऐवजी बीजेपी च्या नेतृत्वातील वर्तमान केंद्र सरकार देशातील जनतेला धार्मिक, जातीय, गरिबी व श्रीमंत आणि लैंगिक आधारावर विभाजीत करून भारतीय संविधानाची मानवीय मुल्ये कमजोर करू पाहत आहे. म्हणून भारतीय संविधानाची मुल्ये जनमानसात अधिक मजबुतीने रुजविणे हे प्रत्येक भारतीयचे कर्तव्य आहे.
यासाठी आज गणराज्य दिनी 26 जानेवारी 2024 ला चंद्रपुरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाचा व भारतीय गणराज्याचा सन्मान करण्याचा निर्णय दि .22 जानेवारी 2024 ला सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटच्या जटपुरा गेट येथील संपन्न कार्यकर्ता बैठकीत घेण्यात आला होता. बैठकीत सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, MIM, CPI, CPM, भारत जोडो, काँग्रेस सेवादल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वंचित बहुजन आघाडी, मुस्लिम आरक्षण हक्क संघर्ष समिती, ओबीसी जनगणना समन्वय समिती, तेली महासंघ, कुणबी समाज संघटना, माळी महासंघ, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन, स्वतंत्र मजदूर युनियन, विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मानव मुक्ती दिन व संविधान सन्मान बाईक रॅली आज स्थानिक गांधी चौकातून सकाळी 10 वाजता निघाली .या रॅलीचे नेतृत्व बळीराज धोटे यांनी केले•
सदरहु बाईक रॅली ही गांधी चौक, डॉ आंबेडकर पुतळा चौक, जटपुरा गेट, रामनगर, डॉ. आंबेडकर कॉलेज, जुना वरोरा नाका चौक, जनता कॉलेज, गजानन मंदिर चौका पासून परत जुना वरोरा नाका चौक, उड्डान पूल मार्गे ट्रॅफिक पोलीस चौक, तुकूम मातोश्री चौक, एसटी वर्कशॉप चौक, परत मातोश्री चौक, गुरुद्वारा रोड मार्गे छत्रपती मेडिकल ते आदर्श पेट्रोल पम्प, बंगाली कॅम्प मार्गे MEL चौक, परत बंगाली कॅम्प चौक, राम नगर पोलीस स्टेशन बस स्टॅन्ड, प्रियदर्शिनी चौक, जटपुरा गेट मार्गे कस्तुरबा चौक, अंचलेश्वर गेट मार्गे बागला चौक, परत अंचलेश्वर गेट मार्गे भानापेठ मार्गे जुना पोष्ट ऑफिस मार्गे कस्तुरबा चौक, जेल रोड मार्गे जोड देऊळ चौक, मेनरोड मार्गे निघाली व ती गांधी चौक येथे परत आली.आयोजित रॅलीत महिला देखिल सहभागी झाल्या होत्या हे विशेष!