Ballarpur city@ news
• माजी. खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते बल्लारपूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमचे उद्घाटन
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
बल्लारपुर: भारतीय प्रजासत्ताकच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्ट संचलित बल्लारपूर येथील स्थानिक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल येथे इंदिरा गांधी स्टेडियमचे उद्घाटन माजी खासदार व कामगार नेते नरेश बाबू पुगलिया यांच्या हस्ते करण्यात आले.
बल्लारपूरच्या मुख्य रस्त्यावर वसलेल्या या स्टेडियमचा भविष्यात विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
या शुभप्रसंगी बल्लारपूर पेपर मिलचे युनिट हेड उदय कुकडे, प्रवीण शंकर, राहुल पुगलिया, रजत शेणॉय, कुणाल शेखर, अजय दुर्गकर, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे, नासिर खान, नाना बुंदेल आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे तारासिंग कलसी, वसंत मांधरे, रामदास वागदरकर, कृष्णन नायर, वीरेंद्र आर्य, अनिल तुंगीडवार, उमेश कोलावार, गजानन दिवसे, सुदर्शन पुली, आशिष मोहता, गजेंद्र सिंग, विनोद महातो आदींनी सहभाग पर्यन्त केले