Gadchiroli(Atappali) taluka@ news
•क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या:भाग्यश्री आत्राम
• अतिदुर्गम तांबडा येथे ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामने
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
एटापल्ली:आदीवासीबहुल भागातील तरुण,तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात क्रीडा कौशल्य असून आयोजित विविध स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या,असे आवाहन माजी जि प अध्यक्ष तथा विद्यमान सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.
गेदा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तांबडा येथे पहिल्यांदाच तरुण आणि तरुणींसाठी आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे बेबीताई नरोटी,सह उदघाटक तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,अध्यक्ष म्हणून गेदा चे सरपंच रीना मडावी,प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते जयराज हलगेकर,उपसरपंच दसरू मट्टामी, अजय पदा, लक्ष्मण नरोटे,संभाजी हिचामी, जितेंद्र टिकले,शिक्षक कुळमेथे,गणेश धुर्वा, भूमिया, गावपाटील तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी एटापल्ली तालुक्यातील विध्यार्थी शालेय जीवनात विविध स्पर्धेत भाग घेऊन राज्यपातळीवर तालुक्याचा नावलौकिक करीत आहेत.असे अनेक माजी विद्यार्थीही गावागावात आहेत.त्यांच्यासाठी अश्या स्पर्धेची गरज आहे.क्रीडा क्षेत्रातील तरुणांसाठी आपण नेहमीच पुढाकार घेत आहोत.येथील तरुणांमधील क्रीडा कौशल्य आणि कला गुण बघून तालुका मुख्यालयात क्रीडा संकुल साठी मोठी निधी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आणि त्याचे बांधकामही पूर्ण झाले आहे. याठिकाणी नियमित सराव करून खेळांमध्ये सातत्य ठेवा,असे आवाहन त्यांनी केले.
विशेष म्हणजे तरुण आणि तरुणींसाठी एकाच मैदानावर सामने आयोजित करण्यात आले असून या स्पर्धेसाठी परिसरातील मोठ्या प्रमाणात चमुंनी सहभाग घेतला आहे.गावातच खेळण्याची संधी उपलब्ध झाल्याने महिला व पुरुषही मैदान गाजवणार आहेत.या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात पारितोषिक ठेवण्यात आले आहे.दरम्यान क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनासाठी गावात आगमन होताच मुंगराज क्रीडा मंडळ तांबडाच्या वतीने गावकऱ्यांनी मान्यवरांचे आदिवासी पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत केले.




