Gadchiroli (aheri)taluka news
• अहेरी येथ प्रसिद्ध ‘टेकडी हनुमान देवस्थान’ माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण..!
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
अहेरी:- संपूर्ण देशात 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव संपन्न होत असताना, अहेरी येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.त्यावेळी अहेरी येथे कलश यात्रा काढण्यात आली.मोठ्या प्रमाणावर अहेरीकर उपस्थित राहून L E D वर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपनाचा आनंद यावेळी अहेरीकर यांनी घेतला,त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले.तसेच
अहेरी येथील प्रसिद्ध “तेल्लागुटा” म्हणजे पांढऱ्या दगडाचा पर्वत या नावाने प्रसिद्ध असलेल्या पर्वताच्या पायथ्याशी स्थापित असलेल्या प्रसिद्ध ‘टेकडी हनुमान देवस्थान’ येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.आणि यावेळी संपूर्ण ‘टेकडी हनुमान देवस्थान’ परिसर हरितमय करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी घेतला.
त्यावेळी हनुमान देवस्थानचे श्री.दिनेश ठिकरे, संतोष जोशी,भाऊराव कन्नके, छोटू मांडवकर,मनोहर बाके, रवी मोहूर्ले,सागरजी अहिरे,ईश्वर मांडवकर,रोहन शुद्धलवार हे उपस्थित होते..!
