Home Breaking News Ballarpur city@ news • पुरोगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी शिवा इंगोले तर...

Ballarpur city@ news • पुरोगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी शिवा इंगोले तर प्रा.शाम मानव करणार उदघाट्न… • बल्लारपुरत राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी…

29

Ballarpur city@ news
• पुरोगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी शिवा इंगोले
तर प्रा.शाम मानव करणार उदघाट्न…

• बल्लारपुरत राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी…

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

बल्लारपूर:
पहिले राज्य स्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन.
दिनांक-२४ फेब्रुवारी-२०२४ रोजी होऊ घातले आहे त्याची जय्यत तयारी सुरु आहे.कार्यक्रम परिसराला महाकवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीं,असे नाव देण्यात आले असून, राजे बल्लाळशाह नाट्य गृह,बल्लारपूर
जिल्हा चंद्रपूर येथे का भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहे.
सकाळी ९:०० वाजता कार्यक्रमाचे उदघाट्न प्रख्यात विचारवंत प्रा.शाम मानव यांच्या हस्ते होईल.संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक शिवा इंगोले (मुंबई),हे या संमेलनाला लाभले आहेत.विशेष अतिथी- निता चापले मॅडम(राष्ट्रीय माजी महिला क्रिकेटर,लेखिका,तथा समाजिक कार्यकर्ता)मुंबई.
प्रमुख उपस्थिती- विजय सूर्यवंशी रायगड. (संस्स्थापक अध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ,भारत),
बाळासाहेब आटांगळे,मुंबई. (राष्ट्रीय कार्याध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ)
संतोष जाधव,नाशिक(राज्य अध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ,भारत)
निलेश ठाकरे(राज्य सचिव,(पुरोगामी पत्रकार संघ,भारत) तर
स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रब्रम्हानंद मडावी हे भूमिका बजावणार आहेत.
स्वागत गीत-कु.स्नेहल शिरसाट,
सूत्रसंचालन -सिमा भसारकर,तर या साहित्य संमेलनाची प्रस्तावना एड. योगिता रायपूरे मांडणार आहेत.
दुपारी :१२:०० वाजता
प्रा.इसदास भडके.यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी,गीतकार खेमराज भोयर करतील तर डॉ.प्रभाकर लोंढे(गोंदिया),विजय भगत(घुग्गूस),जयंत साठे(नागपूर),मधुकर पळसगावकर, डाँ.शुभांगी भोयर,अनघा मेश्राम (नागपूर)शाहिदा शेख(चंद्रपूर),विजय सूर्यवंशी(जळगाव),सिद्धार्थ मेश्राम(नागपूर),सुरेखा बेंद्रे(संभाजी नगर)नागेश वाहुरवाघ(नागपूर),हृदय चक्रधर(नागपूर),शालिक जिल्हेकर(नागपूर)किशोर मुघल(चंद्रपूर) यांचा या कवी संमेलनात सहभाग असणार आहे.याचे संयोजन तथा आभार प्रसिध्द कवयित्री ज्योती चन्ने करतील.
दुपारी २:०० वाजता प्रसिद्ध वक्ता,पुरोगामी विचारवंत
प्रा.जावेद पाशा सर (नागपूर) हे
‘शिवकालीन मुस्लिम मावळ्यांची भूमिका आणी बादशाह बहादूरशाह जफर यांच्या पर्यंतचा प्रवास’ या विषयावर वख्यान करतील.या वाख्यानाचे संयोजन तथा आभार विचारवंत तथा प्रसिद्ध वक्त्या डॉ.अभिलाषा गावतुरे करतील.
दुपारी ३:०० वाजता विलास थोरात (अमरावती) यांचा “हल्ला बोल” हा एकपात्री प्रयोग
सादर करण्यात येणार आहे.
सायंकाळी -४:०० वाजता उठाव साहित्य मंच मुंबई यांच्या अध्यक्षेते खाली विद्रोही कवी संमेलन होणार आहे.या कवी संमेलनाचे सूत्र संचालन-प्रसिध्द आंबेडकरी कवी बबन सरवदे (मुबंई),करतील.तर रमेश भवार (मुंबई),सुरेश जगताप (मुंबई),गजानन गावंडे(मुंबई),विशाल उशिरे(मुंबई) या प्रसिद्ध साहित्यिक कवींचा यात सहभाग असणार आहे.
संयकाळी-५३०:वाजता माजी राष्ट्रीय महिला क्रिकेटर,लेखिका,समाजिक कार्यकर्त्या तथा मार्गदर्शक
निता चापले(मुंबई) यांची प्रगट मुलाखत पुरोगामी साहित्य संसदेच्या विदर्भ अध्यक्षा एड.योगिता रायपूरे,साहित्य संसद चे राज्य अध्यक्ष नरेंद्र सोनारकर घेतील.
सायंकाळी ६:३० वाजता
संजय घरडे(अमरावती)यांच्या अध्यक्षतेखली गजलं संमेलन आयोजित केले आहे.या गजल संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गजलकार जगदीश भगत (वर्धा) हे करतील तर
सुदाम सोनुले, रमेश बुरबुरे,नरेशकुमार बोरीकर,गिरीश खोब्रागडे,आतम गेंदे,रोशन गजभिये इत्यादी नामांकित गजलकारांचा यात सहभाग असेल.सायंकाळी ७:३० वाजता
पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होईल.कवयित्री संगीता घोडेस्वार यांचा समतेचा एल्गार (कविता संग्रह) तर प्रसिद्ध साहित्यिक रंगशाम मोडक यांचा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणी आदिवासी समाज या शोध ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल.
सायंकाळी ८:०० वाजता
राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारोह संम्पन्न होणार असून पवन भगत यांच्या मराठी कादंबरी ‘ते पन्नास दिवस’ साठी
अण्णाभाऊ साठे राज्य स्तरीय साहित्य गौरव पुरस्कार-२०२४,माजी राष्ट्रीय महिला क्रिकेटर निता चापले (मुंबई) यांना राजमाता जिजाऊ राज्य स्तरीय गौरव पुरस्कार-२०२४, रतनकुमार साळवे(संभाजी नगर) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पत्रकारिता गौरव पुरस्कार-२०२४,विजय भसारकर (वरोरा) यांना क्रांतिज्योती सावित्री फुले राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार २०२४,
रजिया मानकर(बल्लारपूर)
फातिमा शेख राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार-२०२४,
शहिद भगत सिंग राज्यस्तरीय युवा साहित्य गौरव पुरस्कार-२०२४.श्रुंखलं खेमराज भोयर(नागपूर)यांच्या इंग्रजी काव्य काव्य संग्रहासाठी तर
राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्कार-२०२४.कु स्नेहल शिरसाट (वरोरा) हिला प्रदान करण्यात येणार आहे.
रात्री ९:०० वाजता संमेलन अध्यक्ष्यांचे अध्यक्षीय भाषण होईल रात्री-९:३० वाजता विद्रोही जलसा या कार्यक्रमाने समारोप करण्यात येईल,अशी माहिती स्थानिक सार्वजनिक विश्राम गृह बल्लारपूर येथे संपन्न झालेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली.पत्रपरिषदेला पुरोगामी साहित्य संसद चे राज्य अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,विदर्भ अध्यक्षा एड.योगिता रायपूरे,इंजि.राकेश सोमाणी,समाजिक कार्यकर्ते गोलू डोहाणे,मृणाल कांबळे,सुजय वाघमारे,नरेंद्र पिंगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.