Home Breaking News Ballarpur taluka@ news • बल्लारपूर पोलिस स्टेशनला आले कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक आसिफराजा...

Ballarpur taluka@ news • बल्लारपूर पोलिस स्टेशनला आले कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख! • पोलिस निरीक्षक शेख यांनी सुंगधीत तंबाखू विक्रेत्यांच्या व अवैध रेती तस्करांच्या बांधाव्यात मुसक्या नागरिकांची अपेक्षा!

42

Ballarpur taluka@ news
• बल्लारपूर पोलिस स्टेशनला आले कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख!
• पोलिस निरीक्षक शेख यांनी सुंगधीत तंबाखू विक्रेत्यांच्या व अवैध रेती तस्करांच्या बांधाव्यात मुसक्या नागरिकांची अपेक्षा!

✍️शंकर महाकाली
शंकर महाकाली:संपादक

बल्लारपुर : चंद्रपुर जिल्ह्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत.दरम्यान बल्लारपूरचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांची बदली नागपूरला झाली आहे.आता आसिफ रजा यांनी बल्लारपूर पोलिस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
घूग्घुस पोलिस स्टेशन येथे वर्षभरापूर्वी पोलिस निरीक्षक आसिफ रजा यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांच्या काळात त्यांनी गुन्हेगारीवर अतिशय उत्तम पध्दतीने नियंत्रण ठेवले होते.त्यांची ओळख चंद्रपूर जिल्ह्यात एक दबंग पोलिस अधिकारी म्हणून आज ही आहे.त्यामूळे बल्लारपूर शहरातील सुंगधीत तंबाखू विक्री व अवैध रेती तस्करांच्या मुसक्या बांधाव्यात अशी येथील जनतेची त्यांच्या कडून अपेक्षा आहे.

बल्लारपूर शहरात सध्या अनेक अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहे.विशेष म्हणजे सुगंधित तंबाखू, कोळसा, वाळू तस्करी हे सगळे होत आहे . सुगंधित तंबाखू माफियांचा बल्लारपूरहा मोठा हब आहे, या ठिकाणाहून जिल्ह्यातील विविध भागात तंबाखूची तस्करी केल्या जाते, परंतु तंबाखू माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे हे सध्या पडद्याआड आहे.त्या विक्तेत्यांवर आजपर्यंत ठोस कारवाई झाली नाही. आता नवनियुक्त पोलिस निरीक्षक या तस्करांवर काय कारवाई करतात याकडे बल्हारपूर वासियांचे लक्ष वेधले आहे.