Home Breaking News Chandrapur(Nagbhid)@news • महिला आघाडी नागभीड तर्फे आयोजित भजन स्पर्धा संपन्न..

Chandrapur(Nagbhid)@news • महिला आघाडी नागभीड तर्फे आयोजित भजन स्पर्धा संपन्न..

309

Chandrapur(Nagbhid)@news
• महिला आघाडी नागभीड तर्फे आयोजित भजन स्पर्धा संपन्न..

✍️अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड: नागभीड येथे महिला आघाडी तालुका नागभीड व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटि भांगडिया यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाच्या वतीने राममंदिर येथे महिलांकरिता भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत तालुक्यातील 12 मंडळांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम रमेश ठाकरे, राजन जैस्वाल ,इंदूताई आंबोरकर अध्यक्ष महिला आघाडी यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सर्वात झाली.

या स्पर्धेत गायत्री महिला भजन मंडळ तळोधी प्रथम क्रमांक,स्वरसाधना महिला भजन मंडळ, नागभीड द्वितीय क्रमांक तर मंजुळा माता महिला भजन मंडळ सावरगाव यांनी तृतीय पारितोषिक पटकाविले.या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सौ.वैशाली लांजेवार व सौ.वीणा नागमोती हे तर कार्यक्रमास सौ.पुष्पा जयस्वाल,विमलताई गिरीपुंजे, डॉ.वनिता गिरीपुंजे, कांचन चीलबुले, मीना अमृतकर, दुर्गा चीलबुले,अर्चना मरकाम, उर्मिला अमृतकर,अर्चना अमृतकर,स्नेहा कुर्झेकर,नितु गोन्नाडे,नमिता गिरीपुंजे,मनीषा येरणे,प्रियंका कोरे,प्रिया लांबट, वनिता लाखे,अनिता गिरीपुंजे, आरती तहलियानी, गीताताई धारणे व अन्य महिला आघाडी सदस्य महिला व स्पर्धक उपस्थित होते.