Home Breaking News Ballarpur taluka@ news • बल्लारपुर वंचित बहुजन महिला आघाडी कार्यकारिणी

Ballarpur taluka@ news • बल्लारपुर वंचित बहुजन महिला आघाडी कार्यकारिणी

197

Ballarpur taluka@ news
• बल्लारपुर वंचित बहुजन महिला आघाडी कार्यकारिणी

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

बल्लारपुर:वंचित बहुजन महिला आघाडी तालुका बल्लारपूर च्या वतीने पळसगाव येथे महिला ग्राम शाखा गठीत करण्यात आली. या महिला कार्यकारणी गठीत करण्याकरिता प्रमुख उपस्थिती सौ कविता गौरकर जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, वंचित बहुजन महिला आघाडी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सौ.नम्रता साव तालुका अध्यक्ष बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडी, अभिलाष चुनारकर तालुका अध्यक्ष बल्लारपूर वंचित बहुजन युवा आघाडी उपस्थित होते.

पळसगाव येथील महिलांना जनजागृती करून बाळासाहेब आंबेडकर तसेच रेखाताई ठाकूर यांचे कार्य कळवण्यात आले व वंचित बहुजन आघाडी च्या संदर्भात परिपूर्ण माहिती देण्यात आली व महिला कार्यकारणी गठीत करण्यात आली.
यावेळी सौ. फुलणं दुर्योधन अध्यक्ष पळसगाव ग्राम शाखा वंचित बहुजन महिला आघाडी, तर सुरेखा भगत , सीमा करमरकर,संतोषी नगराळे यांची ग्राम शाखा महासचिव पदी यांची निवड करण्यात आली. तसेच दर्शना माऊलीकर ,सौ.वच्‍छला दहागावकर उपाध्यक्ष ग्राम शाखा पळसगाव, रिंकू माऊलीकर आयटी सेल प्रमुख ,निवड करण्यात आली.रसिका भगत ,मोनाली दुर्योधन यांचे ग्राम शाखा संघटिका म्हणून निवड करण्यात आली,कमला भगत कोषाध्यक्ष,मानसी मेश्राम सचिव पंचफुलाबाई जीवने, गिरजाबाई धोंगडे ज्येष्ठ सल्लागार निवड करण्यात आली तसेच पोर्णिमा करमरकर,सुरेखा देवगडे, सपना करमरकर, कल्पना दुर्योधन, हर्षदा नगराळे, उज्वला माऊलीकर , आशा रामटेके, शोभा माऊलीकर, रसिका माऊलीकर ,सारिका माऊलीकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आणि इतर महिलांनी सुद्धा पक्षप्रवेश घेतला आहे