Home Breaking News Gadchiroli( Aheri)@News •माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते अतिदुर्गम मेट्टीगुडम येथे क्रिकेट...

Gadchiroli( Aheri)@News •माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते अतिदुर्गम मेट्टीगुडम येथे क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

79

Gadchiroli( Aheri)@News
•माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते अतिदुर्गम मेट्टीगुडम येथे क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

अहेरी:-तालुक्यातील कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या मेट्टीगुडम येथे माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

शहरी भागात नेहमीच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रत्येक वेळी शहरी भागात येऊन आपल्यातील क्रीडा कौशल्य दाखविणे शक्य होत नसल्याने मेट्टीगुडम वासीयांना गावातच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले.या स्पर्धेसाठी पारितोषिक देण्याची मागणी स्थानिक युवकांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे विनंती केली होती.दुर्गम भागातील खेळाडू मध्ये असलेले क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा,याही भागातील उत्कृष्ठ खेळाडूंना प्रोत्साहन मिळवा या उदात्त हेतूने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी आवश्यक असलेले पारितोषिक देण्यासाठी भाग्यश्री ताई आत्राम यांनी पुढाकार घेतल्याने मेट्टीगुडम सारख्या दुर्गम भागात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे शक्य झाले.

नुकतेच या स्पर्धेचे उदघाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून येथील सरपंच सुनीता मडावी,उपसरपंच सिताराम मडावी,शंकर मडावी, सुधाकर कलकोटवार,हनमंतु वेलादी,संजय येमसलवार,गोसाई वेलादी,मुकुंद तेलाम,कैलास चौधरी,मुन्ना वेलादी तसेच परिसरातील नागरिक व खेळाडू तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.