Home Breaking News Chandrapur dist@ news •शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी संतोष पारखी...

Chandrapur dist@ news •शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी संतोष पारखी व चंद्रपुर वाहतुक जिल्हाध्यक्षपदी अरविंद धिमान यांची नियुक्ती!

92

Chandrapur dist@ news
•शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी संतोष पारखी व चंद्रपुर वाहतुक जिल्हाध्यक्षपदी अरविंद धिमान यांची नियुक्ती!

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

चंद्रपुर :- शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आदेशानुसार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण जनार्दन तांडेल यांच्या हस्ते शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांची कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख अरविंद धिमान यांची वाहतुक संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ति करुन दोन्ही जिल्हाध्यक्ष मिळून वाहतुक व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचे महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण तांडेल यांनी निर्देश देवून नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.