Home Breaking News Nagbhid taluka@ news • नागभीड नगरीत भाजपा महिला आघाडी हळदी कुंकू कार्यक्रमाला...

Nagbhid taluka@ news • नागभीड नगरीत भाजपा महिला आघाडी हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा भरपूर प्रतिसाद. • सिने कलाकार रिंकू राजगुरु(आर्ची)प्रमुख उपस्थिति

56

Nagbhid taluka@ news
• नागभीड नगरीत भाजपा महिला आघाडी हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा भरपूर प्रतिसाद.
• सिने कलाकार रिंकू राजगुरु(आर्ची)प्रमुख उपस्थिति

✍️अरुण रामुजी भोले
सुवर्ण भारत:नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड: भारतीय जनता महिला आघाडी नागभीड व भांगडीया फाऊंडेशन, तसेच आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या वतीने ट्विंकल इंग्लिश स्कूल येथे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाला तालुक्यातील महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून.भरपूर असा प्रतिसाद दिला.

हळदी कुंक कार्यक्रमाला प्रमुख विशेष उपस्थिती म्हणून सिने स्टार सैराट या चिञपटातील रिंकू राजगुरू (अर्ची)*ह्या होत्या , महिलांना संबोधित करताना रिंकू राजगुरू यांनी पहिल्यादाच हळदी कुंकू कार्यक्रमाला एवढे मोठ्या संखेने महिला एकत्रित आल्याचे व आयुष्यात मेहनत केल्याशिवाय यश मिळत नसते.व मेहनत करून आपल्या आवडत्या क्षेत्रात महिलांनी यश संपादन करावे. असे प्रतिपादन रिंकू राजगुरू यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून वसंत वार्जुरकर जेष्ठ नेते, राजु देवतळे उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी आघाडी, संजय गजपुरे जिल्हा संघटन महामंत्री, संतोष रडके माजी व्यापारी संघाचे अध्यक्ष हनिफ भाई जादा, तालुकाध्यक्ष,आवेश पठाण सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेश तर्वेकर विधानसभा प्रमुख, उमा हिरे माजी नगराध्यक्ष, माजी गाम पंचायत सरपंच जाॅहागिर कुरेशी, सचिन आकुलवार,माजी बांधकाम सभापती,माजी तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम,मनिष मणियार, सौ,अपर्णा भांगडिया संचालिका भांगडीया फाऊंडेशन, सौ,ममता डुकरे माजी जी. प सदस्य,दिपाली मेश्राम माजी जी. प.सदस्य,हि सर्व प्रमुख मंडळी मंचावर उपस्थित होती.
यावेळी रिंकू राजगुरू यांनी महिलांशी हितगुज करीत त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.

या कार्यक्रमाच्या निमित्याने नागभीड शहरात भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा,महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,भजन स्पर्धा,एक मिनिट स्पर्धा सारख्या स्पर्धेचे आयोजन पण करण्यात आले होते.या स्पर्धेचे बक्षिस वितरण या ठिकाणी करण्यात आले .त्यानंतर हळदी कुंकू कार्यक्रमाला आलेल्या महिलांना भेटवस्तू देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन शरयू दडमल यांनी केले,कार्यक्रमाला उस्फुर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थित महिलांचे व कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व महिला आघाडी सदस्याचे महिला आघाडीच्या वतीने अध्यक्षा श्रीमती इंदुताई आंबोरकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास जवळपास 9 हजार महिला व पुरुष मोठ्या संख्खेनी उपस्थिती होते,