Home Breaking News chandrapur city@ news •भाजपा चे घर चलो अभियान! • बाबूपेठ मंडळाची...

chandrapur city@ news •भाजपा चे घर चलो अभियान! • बाबूपेठ मंडळाची जबाबदारी मुग्धा खाडेंकडे!

134

chandrapur city@ news
•भाजपा चे घर चलो अभियान!
• बाबूपेठ मंडळाची जबाबदारी मुग्धा खाडेंकडे!

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने घर चलो अभियानला सुरुवात झाली आली आहे . दरम्यान शहरातील सामाजिक महिला कार्यकर्त्या मुग्धा खांडे यांच्या कडे स्थानिक बाबूपेठ मंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यांनी येथील नगरसेवक श्याम कनकम, कल्पना बगुलकर, ज्योती गेडाम यांना आपल्या सोबत घेऊन त्यांनी वॉर्डातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या भेटी घेतल्या, शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या निवासस्थानी भेट दिली.घरोघरी जाऊन नागरिकांपर्यंत मोदी सरकारच्या योजना पत्रकाच्या माध्यमातून पोहोचून दिल्या आहेत .

यावेळी त्यांना सर्वसामान्य जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दरम्यान या सुरु असलेल्या अभियानात महिला शिवाय तरुण युवकांचा विशेष सहभाग राहिला. मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, नंदकिशोर बगुलकर, दिवाकर पूद्दटवार, प्रदीप किरमे यांचे या वेळी विशेष सहकार्य लाभले.असे मुग्धा खांडे यांनी या प्रतिनिधीस आज सांगितले.