Chandrapur city@ news
• आशा वर्कर व गट प्रवर्तकांचे मुंबईत आंदोलन सुरूच!
चंद्रपूर: किरण घाटे
मुंबई आझाद मैदानावर आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू असून या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.जीआर काढा ही त्यांची एकमुखी मागणी असून आंदोलनाला एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाला असल्याचे काॅ.विनोद झोडगे यांनी या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरुन बोलताना सांगितले.दरम्यान शासनाने त्यांच्या मागण्यांची अद्याप दखल घेतली नाही.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडों महिला कर्मचारी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना होत असल्याचे आयटकचे नेते रविन्द्र उमाठे म्हणाले.
