Home Breaking News Chimur taluka@ news •नगर परिषद चिमूर ही काग वार्ड नंबर 10 ला...

Chimur taluka@ news •नगर परिषद चिमूर ही काग वार्ड नंबर 10 ला प्राथमिक सुविधा पुरविण्यास असमर्थ असेल तर परत कागला ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा -रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष महेश हजारे यांची मागणी •येत्या शुक्रवारी चिमूरात तीव्र आंदोलन!

187

Chimur taluka@ news
•नगर परिषद चिमूर ही काग वार्ड नंबर 10 ला प्राथमिक सुविधा पुरविण्यास असमर्थ असेल तर परत कागला ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा -रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष महेश हजारे यांची मागणी

•येत्या शुक्रवारी चिमूरात तीव्र आंदोलन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चिमूर येथील रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे तालुकाप्रमुख अशिद मेश्राम यांच्या काग (वार्ड नंबर 10) येथे गेल्या 19 फेब्रुवारीपासून रास्त मागण्यांच्या बाबतीत सुरू असलेल्या गनीमी कावा आंदोलनास रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष महेश हजारे यांनी काल शनिवारी सकाळी भेट दिली.

चिमुर पासुन अवघ्या 7 कि.मी.अंतरावरील काग हे गाव चिमुर नगर परिषद अंतर्गत येत असून निव्वळ राजकीय स्वार्थापोटी न.प .मध्ये त्या गावास समाविष्ट केल्याचा स्पष्ट आरोप हजारे यांनी केलेला आहे.

विकासापासून वंचित असलेला काग मधील वार्ड नंबर 10 हा आजही ग्रामीण स्वरूपातच दिसत असल्याचे शनिवारी या गावास प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्यांनी म्हटले आहे.कुठेही शहरीकरणाचा मागमुस दिसत नसल्याची खंत त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.

नगर परिषद चिमूरने जर आंदोलनातील मागण्या तातडीने पुर्ण केल्या नाही तर येत्या शुक्रवारला रोखठोक प्रहार कामगार संघटना स्थानिक नागरिकांना घेऊन नगर परिषद चिमूरच्या विरोधात आंदोलन तीव्र करणार आहे .जोपर्यंत या गावातील नागरिकांना स्मशानभूमीसाठी रस्ता व शेडची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत काग येथील मृत पावलेल्या व्यक्तींचा अंत्यविधी हा नगर परिषद चिमूरच्या आवारात केला जाईल असा इशारा देखील महेश हजारे यांनी शासन व प्रशासनाला या वेळी दिला आहे.

नगर परिषद चिमूरला केवळ कागच्या वार्ड नंबर 10 साठी निधीची अडचण भासत असेल तर चिमूर शहरात भिक मागो आंदोलन करुन जी रक्कम जमा होईल ती नगर परिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

या शिवाय नालीतुन जी दुर्गंधी येते त्याच्या सहवासात नगर परिषद चिमूरने काम करून दाखवावे यासाठी काग येथील नालीतील अस्वच्छ पाणी न.प.चिमुरला या आंदोलनातुन दिले जाणार असल्याची स्पष्ट भुमिका रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी घेतली आहे.सदरहु आंदोलन स्थळी भेट देतांना रोखठोक प्रहार कामगार संघटना कोरपनाचे तालुकाप्रमुख अफरोज सय्यद(अली) चंद्रपूर पडोलीचे सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे, प्रदिप मेश्राम, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.