Home Breaking News Gadchiroli dist@ news •आदिवासी समाजाला पुढे नेण्यासाठी समाज एकत्र होणे गरजेचे:- माजी...

Gadchiroli dist@ news •आदिवासी समाजाला पुढे नेण्यासाठी समाज एकत्र होणे गरजेचे:- माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम •सल्ला गांगरा शक्ती स्थापना-सप्तरंगी ध्वजारोहण सोहळा व सामाजिक प्रबोधन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न •आदिवासी समाज बांधवा कडून माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे जंगी स्वागत.

134

Gadchiroli dist@ news
•आदिवासी समाजाला पुढे नेण्यासाठी समाज एकत्र होणे गरजेचे:- माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
•सल्ला गांगरा शक्ती स्थापना-सप्तरंगी ध्वजारोहण सोहळा व सामाजिक प्रबोधन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
•आदिवासी समाज बांधवा कडून माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे जंगी स्वागत.

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:सहसंपादक

अहेरी :- तालुक्यातील गडअहेरी येथे आदिवासी समाज बांधवांनी सल्ला गांगरा शक्ती स्थापना-सप्तरंगी ध्वजारोहण सोहळा व सामाजिक,सांस्कृतिक प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते.त्यावेळी समाज बांधवांनी राजे साहेबांचे जंगी स्वागत केले.आदिवासी समाज बांधवांना संबोधित करतांना ते म्हणाले आदिवासी समाजाला पुढे नेण्यासाठी समाज एकत्र होणे गरजेचे असून,समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला संघटित होणे आवश्यक आहे.पुढे बोलताना ते म्हणाले समाजातील युवकांनी स्वतःला मजबूत केलं पाहिजे आणि आपल्या समाजाला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी कार्य केले पाहिजे.मी आपल्या आदिवासी समाजाच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर आहो असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष प्रा.रमेश हलामी सर हे होते.प्रमुख अतिथी म्हणून महेश मडावी सर,अश्विन मडावी,सांबय्या करपेत,नारायण सिडाम,मधुकर सडमेक,संतोष सोयाम,अडव्होकॅटे उदयप्रकाश गलबले,सुनिता दुर्गे पोलीस पाटील सर्व मान्यवराचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.लहान मुली-मुलांनी गोंडी नृत्याच सुंदर सादरीकरण केलं.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामा दब्बा,लक्ष्मीताई आत्राम,प्रियंका इस्टम,पुष्पा मेश्राम,किरण तोरेम,आकाश इस्टम,रुपेश मेश्राम,राजेश कन्नके, प्रीतम आत्राम,खुशाल मेश्राम,विश्वनाथ तोरेम यांनी परिश्रम घेतले.त्यावेळी आदिवासी समाज बांधव,महिला वर्ग,युवा वर्ग मोठ्या संख्येने स्थानिक गावकरी उपस्थित होते.!