Home Breaking News Chandrapur dist@ news • आमदार प्रतिभा धानोकर यांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र.. •साहेब...

Chandrapur dist@ news • आमदार प्रतिभा धानोकर यांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र.. •साहेब भावी भावी पिढीच्या उज्वल भविष्याकरिता ड्रग्स तस्करी रोखा…

123

Chandrapur dist@ news
• आमदार प्रतिभा धानोकर यांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र..
•साहेब भावी भावी पिढीच्या उज्वल भविष्याकरिता ड्रग्स तस्करी रोखा…

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

वरोरा:सध्या महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बिघडलेली दिसून येत आहे. जातीतील भांडणे संपण्याचे नाव घेत नसून त्यासोबतच ड्रग्स तस्करीने डोके वर काढले आहे. पुण्यात सापडलेल्या ड्रग्स चा कारखाना भविष्यातील पिढी बरबाद करण्याचे संकेत देत आहे. महाराष्ट्रातील बेरोजगारांना एकीकडे हाताला काम नाही तर दुसरीकडे ड्रग्स तस्कर युवकांना व्यसनाधीन करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत शहरात ड्रग्स तस्करीचे कारखाने तयार होत असेल तर ही बाब भविष्यातील युवा पिढी करिता धोकादायक असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यात वाढत चाललेले ड्रग्स तस्करांचे जाळे थांबवण्याचे मत पत्रातून व्यक्त केले आहे. भविष्यातील युवा पिढी व्यसनाधीन होणार नाही याकरिता शासनाने मोठे पाऊल उचलावे असे त्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री यांना सांगितले आहे. युवकांना व्यसनापासून रोखण्याकरिता पालकांनी देखील सतर्क राहण्याचे मत प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे.