Home Breaking News Ballarpur city @news •बल्लारपूर शहरात पहिले राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन थाटात संपन्न

Ballarpur city @news •बल्लारपूर शहरात पहिले राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन थाटात संपन्न

86

Ballarpur city @news
•बल्लारपूर शहरात पहिले राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन थाटात संपन्न

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत: संपादक

बल्लारपूर:पुरोगामी साहित्य संसद महाराष्ट्र व्दारा पहिले राज्य स्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन महाकवी वामनदादा कर्डक साहित्य नगरी, राजे बल्हाडशाह सभागृह बल्हारशा जि. चंद्रपूर येथे दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीत थाटात संपन्न झाले. सभागृहाला शाहिद नरेंद्र दाभोडकर तर विचारमंचाला वरिष्ठ पत्रकार शाहिद गौरी लंकेश यांचे नाव देण्यात आले होते.

प्रथम सत्रातील कार्यक्रमाचे उदघाट्न प्रख्यात विचारवंत प्रा.शाम मानव (अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून् करण्यात आले. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत प्रा.जावेद पाशा यांनी जबाबदारी सांभाळली. विशेष अतिथी म्हणून निता चापले (राष्ट्रीय माजी महिला क्रिकेटर,लेखिका, तथा समाजिक कार्यकर्ता) मुंबई,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय सूर्यवंशी रायगड (संस्थापक अध्यक्ष, पुरोगामी पत्रकार संघ, भारत), मा.बाळासाहेब आटांगळे, मुंबई. (राष्ट्रीय कार्याध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ)
मा.निलेश ठाकरे (राज्य सचिव,(पुरोगामी पत्रकार संघ,भारत), डॉ अभिलाषा गावतूरे हे कार्यक्रमाला लाभले होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रब्रम्हानंद मडावी यांनी चोख भूमिका बजावली. उद्घाटन प्रसंगी श्याम मानव यांनी पुरोगामित्वाची व्याख्या, महत्व, त्यांनी घ्यायची भुमिका, व आजच्या तत्कालीन परिस्थितीवर सडेतोड मत मांडले. संम्मेलनाच्या सुरवातीला भारतीय संविधानाचे प्रस्ताविकाचे सामुहिक वाचन केले व स्नेहल सिरसाट याच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.
उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन सिमा भसारकर, संमेलनाची अभ्यासपूर्ण प्रस्तावना एड. योगिता रायपूरे यांनी मांडली तसेच आभार मा. सविता भोयर यांनी केले.
याच सत्रात प्रा.इसदास भडके यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून कवी उपस्थित होते. याचे दमदार सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी,गीतकार खेमराज भोयर यांनी केले. अनघा मेश्राम, विजय भगत, किशोर मुगल, शुभांगी भोयर, मावलीकर, नागेश वाहूरवार, सरिता बिकंलवार, मनिषा वांढरे, छकुली कोटांगले, रोशनी अंबर, प्रबंंम्हानंद मडावी अश्या अनेक कवींनी दर्जेदार कविता सादर केल्या. संयोजन तथा आभार प्रसिध्द कवयित्री ज्योती चन्ने यांनी उत्तम रित्या पार पाडले.
दुस-या सत्रात विलास थोरात (अमरावती) यांचा “हल्ला बोल” हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. तसेच माजी राष्ट्रीय महिला क्रिकेटर, लेखिका, समाजिक कार्यकर्त्या तथा मार्गदर्शक निता चापले (मुंबई) यांची प्रगट मुलाखत पुरोगामी साहित्य संसदेच्या विदर्भ अध्यक्षा एड.योगिता रायपूरे, साहित्य संसद चे राज्य अध्यक्ष नरेंद्र सोनारकर व सीमा भसारकर यांनी घेतली. क्रीडा क्षेत्रात महिलांचे सुवर्ण भविष्य कथन करतांनाच महिलांच्या होत असलेल्या शोषणावर त्यांनी विश्लेषणात्मक उलगडा केला.

सायंकाळी संजय घरडे (अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली गजल संमेलन यशस्वीरीत्या संपन्न झाले. या गजल संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गजलकार जगदीश भगत (वर्धा) यांनी केले. तर प्रसिद्ध युवा गजलकार रमेश बुरबुरे, नरेशकुमार बोरीकर, प्रशांत भंडारी, संगीता बांबोडे व प्रा. जावेद पाशा इत्यादी नामांकित गजलकारांचा यात सहभाग होता. याचे संयोजन व आभार मृणाल कांबळे यांनी केले.
यांनतर कवयित्री संगीता घोडेस्वार यांचा समतेचा एल्गार या कविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी हेमा लांजेकर यांनी संयोजन व आभार मानले.

सत्राच्या अखेर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारोह संम्पन्न झाला. पवन भगत यांच्या मराठी कादंबरी ‘ते पन्नास दिवस’ साठी अण्णाभाऊ साठे राज्य स्तरीय साहित्य गौरव पुरस्कार-२०२४, माजी राष्ट्रीय महिला क्रिकेटर निता चापले (मुंबई) यांना राजमाता जिजाऊ राज्य स्तरीय गौरव पुरस्कार, विजय भसारकर यांना क्रांतिज्योती सावित्री फुले राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार २०२४, मा.रजिया हेमंत मानकर(बल्लारपूर) यांना फातिमा शेख राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार-२०२४, श्रुंखल भोयर याच्या इंग्रजी काव्य संग्रहासाठी शाहिद भगत सिंग राज्यस्तरीय युवा साहित्य गौरव पुरस्कार, तर कु स्नेहल शिरसाट हिला राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्कार-२०२४ प्रदान करण्यात आला. यावेळी शोभा वेल्हे व प्रणित झाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन व आभार व्यक्त केले

पहिल्या पुरोगामी साहित्य संम्मेलनाचे पहिले संमेलनाध्यक्ष होण्याचा मान घेतलेले जेष्ठ साहित्यिक प्रा. जावेदजी पाशा यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना पहिले पुरोगामी साहित्य संमेलनाचे महत्व व त्यामुळे साहीत्याच्या बदलणा-या संकल्पना याची विस्तृत मांडणी केली . एका विशिष्ट नावांखाली एकत्र न येता सर्व धर्मियांनी सर्वमावेशक भुमिका घेवून जे जे प्रगतीशील व परिवर्तनवादी आहे त्यांनी या संसदेशी जुळण्याचे आवाहन केले. साहित्य,समाज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळतील मुस्लीमांचे योगदान,भारतीय बहुजन सभ्यता आणी वर्तमान परिस्थितीवर कठोर भाष्य केले. संम्मेलनाध्यक्ष म्हणून त्यांनी सगळ्याच सत्रात मंचावर व सभागृहात आपली उपस्थिती दर्शवत झालेल्या संम्मेलनाचा अध्यक्षिय मनोगतात आढावा घेतला. तसेच यावेळी पुरोगामी साहित्य संसद महाराष्ट्र व्दारा विविध विषयांवर ठराव अध्यक्षांच्या हस्ते वाचून घेवून ते सर्वानुमते पारीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन प्रणित झाडे यांनी तथा आभार रंगश्याम मोडक यांनी मानले.

हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी पुरोगामी साहित्य संसद चे सर्व कार्यकारणी सभासद, सदस्य तसेच शहरातील विविध संघटनांनी तसेच भास्कर रामटेके, इंजि.राकेश सोमाणी, समाजिक कार्यकर्ते गोलू डोहाणे, मनोज मोडक, सुनिल सिरसाट सुजय वाघमारे, नरेंद्र पिंगे, सोनाली कवाडे, सीमा वाकडे, रूपाली सोनारकर इत्यादींनी महत्वपूर्ण भुमिका निभावत परिश्रम घेतले…