Home Breaking News Chandrapur city@ news • विकासाला गती देणारा अर्थसंकल्प:आ. किशोर जोरगेवार

Chandrapur city@ news • विकासाला गती देणारा अर्थसंकल्प:आ. किशोर जोरगेवार

78

Chandrapur city@ news
• विकासाला गती देणारा अर्थसंकल्प:आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर :किरण घाटे

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजग, व्यापारी अशा घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा अर्थसंकल्प राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा असल्याचे अर्थसकंल्पावर प्रतिक्रिया देतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
सरकार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. याचाच प्रत्यय पुन्हा अर्थसंकल्पातून आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांना स्वयंरोजागारातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी मतदार संघात आपण ग्रीन आटो संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील होतो, आता या अर्थसंकल्पात 5 हजार महिलांना पिंक रिक्षा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हा उपक्रम महिलांच्या आर्थिक उन्नती सह महिला सुरक्षेसाठी महत्वपूर्ण योगदान देणारा ठरणार आहे. रोजगार हमी योजनेसाठी 2 हजार 205 कोटी रुपये, मराठी विभागासाठी 71 कोटी रुपये, जिल्हा वार्षीय योजनेसाठी 18 हजार 165 कोटी रुपयांची तरदुत अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.18 लघु-वस्त्रोद्योग संकुल स्थापन करुन सुमारे 36 हजार रोजगार निर्मिती करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलसीस सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. एकंदरीत विचार केल्यास समाजातील सर्व घटकाला स्पर्श करुन न्याय देणारा राज्यहिताचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे.