Home Breaking News ⬜⚪🌀दप्तर⬜⚪🌀

⬜⚪🌀दप्तर⬜⚪🌀

125

⬜⚪🌀दप्तर⬜⚪🌀

सुवर्ण भारत:किरण घाटे

दप्तराच्या घेऊनी आठवणी
पुन्हा बालपणात जाऊ
गुज गोष्टीत त्याच्या रमुनी
त्याचे गुणगान गाऊ

“दप्तर ” म्हणजे निव्वळ पाठीवर घेऊन जाणारी पिशवी नव्हे, त्याच्या भोवती अनेक आठवणींची माळ आहे, पूर्वी आजच्या इतके दप्तर खूप मोठे व जड नसायचे आज मुलांचे दप्तर हातात घेऊ शकत नाही इतके जड असते. घरात एका भिंती वर मुलांचे टाईम टेबल टांगलेलं असायचे, त्याप्रमाणे रात्री अभ्यास झाला की दप्तर भरून ठेवलं जायच, सकाळी शाळेत जाताना आई किंवा बाबा यांच्या कडून पन्नास पैसे व जास्तीत जास्त एक रुपया घेऊन जायच त्यावेळी हे पैसे देखील खूप होते ते ही दररोज मिळायचे नाहीत, शाळेत दुपारच्या सुट्टीत महालक्ष्मी मंदीर जवळ असल्यामुळे तेथे जाऊन चिंचेचे गोळे, आवळा, आंबा फोड असे मैत्रिणी सह घेऊन दप्तरात लपवायचे व हळूहळू मजा घेत खायचे वाटेत ही शाळा सुटली की त्याचा आस्वाद घेत मैत्रिणी बरोबर घर गाठायचे. हे दप्तर आपण म्हणतो ना आजीबाईचा बटवा अशेच असायचे कारण यामध्ये निव्वळ वह्या, पुस्तक, कंपास पेटी, पेन वैगेरे नसून अजूनही खूप काही दडलेले असायचे. जसे की चॉकलेट पेपर, रिबीनी, व आमच्या वेळी राजेश खन्ना याचे क्रेज होते त्यावेळी हाथी मेरे साथी खूप गाजला तसेच धर्मेंद्र, जितेंद्र, हेमा, रेखा अशा गाजलेल्या फिल्मी कलाकारांचे फोटो चॉकलेटच्या आतील कागदावर असायचे ते स्क्राच केले की जो फोटो दिसायचा काय विचारू नका मैत्रिणींचा दंगा मग फोटो मला पहायला असा दंगा मग दुसऱ्याला कोणाचा फोटो आला ही पहायची उत्सुकता मग एकच दंगा, मग हे फोटो दप्तरात एका डब्यात साठवायचे आहे की नाही मज्जा. तर अशा अनेक गमती या दप्तराशी संबंधित आहेत.

दप्तरात लपवलेल्या चॉकलेटच्या पेपरनी आम्ही फुलपाखरू करायचो,भावंड यात खूप रमायचो, खूप वेळा शाळेतून येताना शेजारच्या बागेतील
आंबा, पेरू, व रानातील बोरे, आवळे हे देखील दप्तरात असायचे खूप मजा यायची

अशा दप्तराच्या गमती जमती आजच्या विषयामुळे मनात फेर धरू लागल्या आहेत. व बालपणातील गमतीत रमू लागल्या आहेत.

🟣♦️🟢सौ. ऋचा हनुमंत महाबळ, सहज सुचलं सदस्य सिंधुदुर्ग⚪⚪⚪⚪⚪⚪