Home Breaking News Varora@taluka news •माळी समाज बांधवांना कृषी व गृह उद्योगावर मार्गदर्शन ...

Varora@taluka news •माळी समाज बांधवांना कृषी व गृह उद्योगावर मार्गदर्शन •माळी समाजानी उद्योगातून सक्षम व्हावे – उद्योजक गोविंद माळी

131

Varora@taluka news
•माळी समाज बांधवांना कृषी व गृह उद्योगावर मार्गदर्शन

•माळी समाजानी उद्योगातून सक्षम व्हावे – उद्योजक गोविंद माळी

✍️खेमचद नेरकर
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी वरोरा

वरोरा : तालुका माळी समाज सेवा मंडळ तर्फे माळी समाज महिला व पुरुष व युवकांनी स्वतःचा गृह व कृषी उद्योग सुरू करावा म्हणून माळी समाजा करिता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते गृह उद्योग सुरू व्हावा व एक व्यवसाय सुरू करावा असे प्रत्येक समाज बांधवांना वाटत होते व त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे समाजातील लोकांनी हळहळ व्यक्त केल्याने व समाजाला खरच योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याने समाजाचे पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध उद्योजक गोविंद केशव सुमन माळी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्री यू, बी एम अग्रो इंडस्ट्रीज पुणे यांचे मार्गर्शन शिबिराचे आयोजन दिनांक 15/2/24 रोज गुरुवरला निळकंठराव शिंदे प्रशासकीय महाविद्यालय वरोरा येथील हॉल मध्ये असयोजित केले या मार्गदर्शनाला समाजातील उपस्थित सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे शिबिराला उपस्थित सर्वांना आनंद झाला व समाजाने गटाचे माध्यमातून गृह उद्योग सुरू करण्याचा विश्वास व्यक्त केला,सादर मार्गदर्शन शिबिर यशस्वी करण्या करता मंडळाचे अध्यक्ष राजू डोंगरे,रमेश लांजेवार ,विठ्ठलराव बोबडे,सूरज बोबडे,केशवराव लोथे,पद्माकर डोंगरे,गोपाळराव निंबाळकर ,सतीश राजणकर अभिजित सपाटे यांनी अथक परिश्रम घेतले यात ग्रामीण भागातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.