Home Breaking News Chandrapur dist@ news •कोतवाल मनोज वालदेंची चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल! •वालदे यांच्या...

Chandrapur dist@ news •कोतवाल मनोज वालदेंची चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल! •वालदे यांच्या चल अचल संपत्तीची चौकशी करण्याची केली दत्तात्रय समर्थ यांनी मागणी! ‌‌• कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी -मनोज वालदे

583

Chandrapur dist@ news
•कोतवाल मनोज वालदेंची चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल!
•वालदे यांच्या चल अचल संपत्तीची चौकशी करण्याची केली दत्तात्रय समर्थ यांनी मागणी! ‌‌• कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी -मनोज वालदे

‌चंद्रपूर :किरण घाटे

गेल्या अठरा वर्षांपासून मूल तालुक्यातील राजगड येथे कोतवाल पदावर कार्यरत असणारा कोतवाल मनोज उध्दव वालदे यांच्या चल अचल संपत्तीची चौकशी करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय शामराव समर्थ यांनी एका लेखी निवेदनातुन नुकतीच केली आहे.तश्या आशयाचे एक निवेदन त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे सादर केले आहेत.एव्हढेच नव्हे तर समर्थ यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसेच महसूल आयुक्त नागपूर यांच्या कडे कागदपत्रे जोडून तक्रार दाखल केली आहे.एक सर्वसाधारण कोतवाल म्हणून त्यांची गणना असून घरी कोणतीही जुणी श्रीमंती नसताना त्यांनी मूल नगरीत 22,75073 हजार रुपये किंमतीचे मकान खरेदी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.सदरहु मकानाची रितसर विक्री देखील झाली असून ही बाब सर्वांना आश्चर्यचकीत करणारी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
उपरोक्त कोतवालाकडे एवढी मोठी संपत्ती कुठुन आली असा सवाल देखील समर्थ यांनी दिलेल्या तक्रारीतून उपस्थित केला आहे.

मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.दत्तात्रय समर्थ यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नाही.उगाच समर्थ माझी बदनामी करत आहे.मी आपल्या अठरा वर्षांच्या नोकरीत कुठलेही गैरव्यवहार आजपावेतो केले नाही.मी जमा करून ठेवलेल्या व बॅंके कडून कर्जाची उचल करून मूल नगरीत जुणे घर खरेदी केले हे सत्य आहे.असे मनोज वालदे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.