Home Breaking News Ballarpur city@ news • उलगुलान संघटनेचे बल्हारपूरच्या मुख्याधिका-यांना निवेदन मालमत्ता कर...

Ballarpur city@ news • उलगुलान संघटनेचे बल्हारपूरच्या मुख्याधिका-यांना निवेदन मालमत्ता कर आकारणीवर लावलेले अतिरिक्त शुल्क रद्द करा!

104

Ballarpur city@ news
• उलगुलान संघटनेचे बल्हारपूरच्या मुख्याधिका-यांना निवेदन
मालमत्ता कर आकारणीवर लावलेले अतिरिक्त शुल्क रद्द करा!

चंद्रपूर :किरण घाटे

बल्लारपूर: नगरपरिषदेने मालमत्ता धारकांकडून कर आकारणीला विलंब झाल्यास त्यावर महिन्याकाठी 2 टक्के अतिरीक्त दंड म्हणून शुल्क आकारणे सुरू केले आहे.हे अन्यायकारक असून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.त्यामुळे‌ मालमत्ता करावर लावलेले अतिरीक्त शुल्क रद्द करा अशी मागणी उलगुलान संघटनेने केली असून तसे निवेदन संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना आज देण्यात आले आहे.

शहरातील नागरीकांना दि.31 मार्च पर्यंत मालमत्ता कराचा भरणा करण्याचे बल्लारपूर नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.तसेच 31 मार्च नंतर मालमत्ता कराचा भरणा केल्यास किंवा विलंब झाल्यास महिन्याकाठी 2 टक्के दंड म्हणून अतिरीक्त शुल्क लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

नगरपरिषद प्रशासन जनतेची आर्थिक पिळवणूक करत असून दंडाची रक्कम तात्काळ रद्द करावी अन्यथा उलगुलान संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राजु झोडे, संपत कोरडे, श्यामभाऊ झिलपे, नवीन डेविड, पंचशील तामगाडगे, मंगेश बावने, प्रदिप रामटेके आदिं उपस्थित होते