Home Breaking News Gadchiroli(Mulchera)@News • भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सुंदरनगर ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचा शुभारंभ...

Gadchiroli(Mulchera)@News • भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सुंदरनगर ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचा शुभारंभ !!

180

Gadchiroli(Mulchera)@News
• भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सुंदरनगर ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचा शुभारंभ !!

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

मुलचेरा:-तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत भवनीपुर, भगतनगर, श्रीनगर, तरुणनगर, खुदीरामपल्ली,सुंदरनगर आदी गावांचा समावेश असून या गावांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सर्वच ग्रामपंचायत अंतर्गत गावांचा चेहरामोहरा बदलविण्याचा निश्चय केला असून आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणले.विविध पाडे आणि वस्त्यात देखील विकास कामांचा धडाका सुरू आहे.सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत गावांत देखील मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार आहेत.

नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम मुलचेरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना या ग्रामपंचायत अंतर्गत गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.यावेळी माजी जि प सभापती युधिष्ठिर बिस्वास, माजी जि प सदस्य रवींद्र शहा,सुंदरनगर चे सरपंच जया मंडल, विवेकानंदपूर चे सरपंच भावना मिस्त्री,ग्रामपंचायत सदस्य निखिल इज्जतदार,रंजित स्वर्णकार,मनोज कर्मकार,अपूर्व मुजुमदार,विद्युत मंडळ, सपन विश्वास,सुभाष पटेल,तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक आणि स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.