chandrapur city@ news
• शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील 80 लक्ष रुपयांच्या कामाचे आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन
चंद्रपूर : किरण घाटे
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 80 लक्ष रुपयांच्या निधीतून शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील सिमेंट काँक्रीटच्या रोडचे बांधकाम करण्यात येणार आहे. सदर कामाचे आज आमदार जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, सेवा निवृत्त प्राचार्य रविंद्र मेहेदंळे, सहाय्यक
प्रशिक्षणार्थी प्रणाली डहाटे, प्राचार्य आर. बी वानखेडे, बंडोपंत बोढेकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास केल्या जात आहे. दरम्यान .येथील सिमेंट काँक्रीट रोडच्या बांधकामाची मागणी आमदार जोरगेवार यांच्याकडे करण्यात आली होती. सदरहु कामासाठी जिल्हा वार्षीक योजने अंतर्गत 80 लक्ष रुपयांचा निधी देण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी प्रयत्न केले होते. अखेर सदर
कामासाठी 80 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे आमदार जोरगेवार यांच्या भुमीपूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना आकार देण्याचे काम शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातुन केल्या जात आहे. येथुन निघणारा विद्यार्थी हा कौशल्य प्राप्त करुन निघतो. याचा त्याला रोजगार उपलब्धीसाठी उपयोग होतो. अश्या संस्था बळकट झाल्या पाहिजे. येथे सोई सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शक्य ते सर्व सहकार्य करण्याची आमची भूमिका असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.