Ballarpur city@ news
• युवक काँग्रेसने लावले गोलपुलिया रोडच्या मध्य भागी बेशरमाचे झाडे ,वेधले प्रशासनाचे लक्ष
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
बल्लारपूर : रेल्वे प्रशासनाने काही दिवसां पूर्वी तिसऱ्या व चौथ्या लाइनचे कामे केली .यावेळी रेल्वे व मजीप्राने गोल पुल्याच्या आतल्या रोडला कामे करताना तो पूर्ण खराब केला . ठेकेदार म्हणाले होते येथून जाण्या पूर्वी पूर्ण रोड बनवून देतो .पण तो त्यांनी केला नाही.तो ठेकेदार सध्या दिसेनासा झाला आहे.रोड पूर्णता खराब झाला आहे येण्या-जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.बस्ती विभाग नागरिकांना खूप अड़चनींना तोंड द्यावे लागत आहे.प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साठी आज गोलपुलीयात युवक कांग्रेसचे प्रदेश सचिव चेतन गेडाम यांनी बेशरमांची झाड़े लावुन विरोध दर्शवित या वेळी प्रदर्शन केले.
एनएसयूआय जिल्हा अध्यक्ष शफक शेख, जिल्हा महासचिव शंकर महाकाली, विधानसभा अध्यक्ष जूनेद सिद्दीक़ी, तालुका अध्यक्ष रुपेश भोयर,एनएसयूआयचे दानिश शेख,तालुका उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे, सामाजिक कार्यकर्ता आकाश दुर्गे,कामगार सेल अध्यक्ष करण कामटे,ओबीसी नेते विवेक कुटेमाटे,अल्पसंख्यक कांग्रेस शहर उपाध्यक्ष आफ़ताब पठान, कैलाश धनोरकर, सुनील मोतीलाल गोपाल कलवल, संतोष बरसागड़े, रोहित पठान, अमोल झांमरे,अक्षय आरेकर, सोनू आमटे, राजा केशकर,शंकर गडमवार,अक्षय वांढरे,बशीर सिद्दीक़ी, श्रीकांत गुजरकर, शबीर शेख, रुपेश मून, सागर गेडाम, या शिवाय युवक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
