Home Breaking News Varora taluka@ news • गोवंश तस्करीत दोन आरोपींना अटक • 41 लाखाचा...

Varora taluka@ news • गोवंश तस्करीत दोन आरोपींना अटक • 41 लाखाचा मुद्देमाल जप्त वरोरा पोलिसांची कारवाई

103

Varora taluka@ news
• गोवंश तस्करीत दोन आरोपींना अटक
• 41 लाखाचा मुद्देमाल जप्त
वरोरा पोलिसांची कारवाई

✍️खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : गोवंश तस्करी करून ट्रक वाहन नागपूरकडून हैद्राबादला जाणार आहे अशी गुप्त माहिती वरोरा पोलिसांना 8 मार्च 2024 ला मिळाली.गोपनीय माहितीनुसार रत्नमाला चौकात वरोरा पोलीस स्टॉप ने सापळा रचला.आणि ट्रक क्र.एम एच 32 ए के 5786 ला थांबवून झडती घेतली असता 53 नग बैल की. अंदाजे 10,60,000 रू. व ट्रक असा एकूण.30,60,000 रू. चां मुद्देमाल जप्त केला.ट्रक चालक झनकलाल मरकाम. रा.मध्यप्रदेश व धीरज रेड्डी रा.नागपूर यांचेवर कार्यवाही केली.सदर कारवाई 8 मार्च 2024 चे रात्रीची आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक.रिना जनबंधू,सहा.पोलीस अधीक्षक,तथा उपविभागीय पोलिस अधीक्षक वरोरा नाओमी साटम.पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनात सपोनी योगेंद्रासिह यादव, पोहवा दिलीप सूर,दीपक दुधे यांनी पार पाडली.