• महाराष्ट्र ट्राॅयबल समितीच्या वतीने वणीत जागतिक आदिवासी महिला दिन उत्साहात साजरा!
- वणी -प्रतिनिधी
रविवारला वणीतील नानासाहेब गोहोकार सभागृहात(शेतकरी भवनात)आदिवासी महिलादिन थाटात व उत्साहात पार पडला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲडव्होकेट संतोष भादिकर यांनी विभुषित केले होते तर प्रमुख अतिथी म्हणून डाॅ.संगीता किनाके,मंथना सुरपाम, सुनिता शालुरकर,रंजना राजगडकर उपस्थित होत्या.या शिवाय या आयोजित कार्यक्रमाला अनुराधा कोरवते आशा कोवे, माला उईके,लक्ष्मी धुर्वे,मेघा राजगडकर, सुधा मडावी,भारती भादिकर, दर्शना मडावी आदिंची उपस्थिती लाभली होती.
