Home Breaking News • एसपींचा दणका; रेती तस्करांत निर्माण झाली भीती -अवैध रेती नेण्याचा खेळ...

• एसपींचा दणका; रेती तस्करांत निर्माण झाली भीती -अवैध रेती नेण्याचा खेळ आला उघडकिस ! • भल्या पहाटे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आवळल्या रेती माफियांच्या मुसक्या!

264

• एसपींचा दणका; रेती तस्करांत निर्माण झाली भीती -अवैध रेती नेण्याचा खेळ आला उघडकिस !

• भल्या पहाटे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आवळल्या रेती माफियांच्या मुसक्या!

चंद्रपूर : किरण घाटे

एकिकडे चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाचे व जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे फिरते महसूल पथक दिवस रात्र कार्यरत असतांनाच चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी गुप्त माहितीच्या आधारे मूल तालुक्यातील गोंडसावरी नजिक असलेल्या नदी पात्रातून रेतीची अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या तस्करांना चांगलाच धडा शिकविला आहे.काल पहाटे तीन वाजता त्यांनी ही कारवाई करीत तीन मोठी वाहने , एक पोकलेन मशिन व एक बेलोरा गाडी ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासोबतच जिल्ह्यातील अनेक भागात अवैध गौण खनिज नेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते .जनतेची ओरड ही वाढू लागली होती . रेती तस्कर कोणास जुमानत नव्हते. रेती घाटांवर रात्रीच्या वेळेस जाण्याची हिंमत कोणी दाखवित नव्हते. त्यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावत होते अश्यातच चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक यांनी रेती तस्करांच्या विरोधात कंबर कसून मूल तालुक्यात ही मोठी कारवाई करुन दाखविली .त्यामुळे मूलच्याच नव्हे तर अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यातील रेती माफियांचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत.दरम्यान पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यात कायदा शांतता व सुव्यवस्था ठेवण्या सोबतच त्यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा चांगलाच सपाटा लावला हे तितकेच खरे आहे.या तालुक्यात झालेल्या धडाकेबाज कारवाईमुळे रेती तस्करांकडे काम करणारे रोजंदार ” नको रे बाबा आता तुझी रोजी” कारवाईस समोर जाईल कोण ?असे दबक्या आवाजात म्हणत असल्याचे ऐकिवात आहे.विशेष म्हणजे अनेकांनी पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.