Home Breaking News •चंद्रपूर जिल्ह्यात घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच! •आजचा 14 वा...

•चंद्रपूर जिल्ह्यात घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच! •आजचा 14 वा दिवस आंदोलनात 15 कर्मचारी सहभागी

290

•चंद्रपूर जिल्ह्यात घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच!
•आजचा 14 वा दिवस आंदोलनात 15 कर्मचारी सहभागी

चंद्रपूर :किरण घाटे

ग्रामीण गृहनिर्माण योजना ही शासनाची अत्यंत महत्वाची व लक्षवेधी योजना असून रात्रंदिवस राबून वेळेत काम करणाऱ्या जिल्हा स्तरीय प्रोग्रामर व तालुका स्तरीय ऑपरेटर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. घरकुल योजना-ग्रामीण च्या प्रोग्रामर व ऑपरेटर यांचे मासिक मानधन Dec. 2023 To Feb 2024 पर्यंत, 2021 पासून Arrieas व इतर बाबी पूर्ण करणेबाबत चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन यांना दि. 29.02.2024 ला निवेदन सादर केले होते.
त्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी त्यांनी दि. 07 मार्च 2024 ला काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक डॉ.सुभाष पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना देखील जिल्हास्तरीय प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी त्यांच्या कामबंद आंदोलन बाबत या पूर्वीच रितसर लेखी निवेदन सादर केले आहे.
केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे संपूर्ण काम जिल्हा स्तर प्रोग्रामर व तालुका स्तर ऑपरेटर गेल्या कित्येक वर्षापासून काम करीत आहेत. या काम आंदोलनात
जिल्हा प्रोग्रामर कु. दिपाली जवळे, जिल्हा ऑपरेटर कु. मीनाक्षी क्षीरसागर, तालुका ऑपरेटर कु. पल्लवी पराते, कु. दर्शना बुरडकर, नितीन वेलपुलवार, अंगद गुंडले, महेश शेळके, प्रकाश घडसे, स्वप्निल भगत, प्रणित बोबाटे, प्रफुल करपे, गौरव सोरते, राजेंद्र खोब्रागडे, सचिन भसारकर, सचिन बुरांडे, पंकज झुरे, राजकुमार बावणे आदिं कर्मचारी सहभागी झाले आहेत.सदरहु आंदोलनामुळे शासकीय कामकाजावर विपरित परिणाम निर्माण झाला असल्याचे बोलल्या जाते .ते कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी या आंदोलनात उतरले आहेत . दरम्यान शासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अशी सर्व स्तरातून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.