Home Breaking News • होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत तेली समाजाची भूमिका राहणार तटस्थ ! •...

• होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत तेली समाजाची भूमिका राहणार तटस्थ ! • चंद्रपूरात पार पडली तेली समाजाची एक महत्वपूर्ण निर्धार बैठक • बैठकीला सुर्यकांत खनके,अजय वैरागडे, जितेंद्र इटनकर,चंदा वैरागडे, मीनाक्षी गुजरकर ,गोविल मेहरकुरे, योगेश देवतळे, विकास घटे ,आकाश साखरकर, निलेश बेलखेडे, रविन्द्र जुमडे,शैलेश जुमडेंची उपस्थिती!

371

• होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत तेली समाजाची भूमिका राहणार तटस्थ !
• चंद्रपूरात पार पडली तेली समाजाची एक महत्वपूर्ण निर्धार बैठक
• बैठकीला सुर्यकांत खनके,अजय वैरागडे, जितेंद्र इटनकर,चंदा वैरागडे, मीनाक्षी गुजरकर ,गोविल मेहरकुरे, योगेश देवतळे, विकास घटे ,आकाश साखरकर, निलेश बेलखेडे, रविन्द्र जुमडे,शैलेश जुमडेंची उपस्थिती!

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तेली समाजातील विविध संघटनेच्या पदाधिकात्यांची चंद्रपूरात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली
या वेळी तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सुचने प्रमाणे समाज बांधवांनी तटस्थ राहावे तदवतचं समाजातील सर्व पदाधिकारी समाज बांधवांनी एकत्र येऊन सर्वानुमते निर्णय घेण्याचे ठरले असल्याचे ताजे वृत्त आहे.

चंद्रपूर -तुकुम रोडवरील स्थानिक मातोश्री सभागृहात आज तेली समाजाची एक बैठक पार पडली या वेळी विदर्भ तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष अजय वैरागडे, तैलिक युवा एल्गार संघटना जिल्हाध्यक्ष जितेंद्र इटनकर, तैलिक महिला एल्गार संघटना जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, विदर्भ तेली महासंघ महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी गुजरकर, तैलिक युवा एल्गार संघटना शहर अध्यक्ष माजी नगरसेवक आकाश साखरकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष गोविल मेहरकुरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा जिल्हाध्यक्ष तथा सिनेट सदस्य निलेश बेलखडे, माजी नगरसेवक रवींद्र जुमडे, तेली युवा एल्गार संघटनेचे जिल्हा सचिव विकास घटे, तेली समाजाचे युवा नेते शैलेश जुमडे, तैलिक युवा एल्गार संघटना सहसचिव योगेश देवतळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदरहु बैठकीत सर्व तेली संघटना एकत्र येऊन काही दिवसांतच समाजाची पुढची दिशा ठरवून ती जाहीर करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.