Home Breaking News Bhadravti taluka @news • पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीच्या नविन कार्यकारिणीची घोषणा! •अध्यक्ष...

Bhadravti taluka @news • पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीच्या नविन कार्यकारिणीची घोषणा! •अध्यक्ष पदी डाॅ.ज्ञानेश हटवार तर उपाध्यक्ष पदी मनोज मोडक यांची निवड ! •अनेकांनी केले हटवार व मोडक यांच्या नियुक्तीचे स्वागत!

333

Bhadravti taluka @news
• पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीच्या नविन कार्यकारिणीची घोषणा!
•अध्यक्ष पदी डाॅ.ज्ञानेश हटवार तर उपाध्यक्ष पदी मनोज मोडक यांची निवड !
•अनेकांनी केले हटवार व मोडक यांच्या नियुक्तीचे स्वागत!

सुवर्ण भारत: किरण घाटे (उप संपादक)

चंद्रपूर – पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीची दि.१०मे ला स्थानिक हाॅटेल सनी पाॅइंट येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात सर्वानूमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली .पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीच्या अध्यक्षपदी डाॅ.ज्ञानेश हटवार यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी मनोज मोडक, सचिव प्रवीण चिमूरकर, कोषाध्यक्ष-शिरीष उगे,संपर्क प्रमुख-हर्षल रामटेके ,प्रसिद्धीप्रमुख-आशिष कोटकर, सदस्य म्हणुन उमेश कांबळे यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष डाॅ.ज्ञानेश हटवार यांच्या मार्गदर्शनात पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षांत जि.प.शाळेतील मुलांना शालेय साहित्य वितरण करण्याचे ठरविण्यात आले.
पुरोगामी पत्रकार संघाचा विस्तार व पुरोगामी पत्रकार संघ सामान्य जनतेचा बुलंद आवाज म्हणुन ओळख निर्माण करेल असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष डाॅ.ज्ञानेश हटवार यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला . दरम्यान या नविन कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचे अनेकांनी स्वागत केले आहे.