Ballarpur taluka@ news
•वाघाने घेतला एकाचा बळी
•बल्लारपूर तालुक्यातील घटना:नागरिकांत भीतीचे वातावरण
सुवर्ण भारत:शंकर महाकाली
बल्लारपूर :- बकरी चाऱ्याला गेलेल्या एका इसमाचा वाघाने बळी घेतल्याची खळबळजनक घटना बल्लारपूर तालुक्याच्या कळमना जंगलात घडली.
कोर्टिमक्ता येथील रहिवासी वामन गणपती टेकाम, वय ५९ वर्ष हे आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास नियतक्षेत्र कळमना मधील जंगलात बकरी चारण्यासाठी गेले. होते. तिथे गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना सदरहु इसम वनात बकरी चारत असल्याचे दिसताच त्यांना वनाच्या बाहेर काढण्यात आले व परत वनकर्मचारी गस्तीवर समोर निघुन गेले. परंतु सदर इसम हा पुन्हा बकऱ्या चारण्यासाठी बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमना मधील राखीव वनखंड क्रमांक ५१४ए मध्ये गेला असता दुपारी १२ वाजताचे सुमारास त्यांचेवर वाघाने हल्ला करत त्यास जागीच ठार केले. घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे.) हे आपले अधिनस्त वनकर्मचारी यांचे सोबत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मौक्यावर पाहणी केली असता वाघाचे हल्यात वामन गणपती
टेकाम यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्याच क्षणी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा तयार केला व नंतर शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरती सानुग्रह आर्थिक मदत देण्यात आली.
सदरहू परिसरात गस्त वाढणविण्यात आलेली असुन वाघाचा मागोवा घेण्याकरीता २० ट्रॅप कॅमेरे व १ लाईव्ह कैमेरा लावण्यात आलेला आहे.
या प्रकरणाची पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुरचे उपवनसंरक्षक, श्रीमती. श्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.
बल्हारशाह कळमना जंगल परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे नागरीकांनी वनात प्रवेश करु नये असे आवाहन वनविभागा मार्फत करण्यात आले आहे.
