Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर – अनेकांचा आम आदमी पार्टीत प्रवेश !...

Ballarpur city@ news • बल्लारपूर – अनेकांचा आम आदमी पार्टीत प्रवेश ! •जेष्ठ पदाधिका-यांनी केले “त्यांचे” स्वागत

86

Ballarpur city@ news
• बल्लारपूर – अनेकांचा आम आदमी पार्टीत प्रवेश !
•जेष्ठ पदाधिका-यांनी केले “त्यांचे” स्वागत

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

बल्लारपूर :बल्लारपूर तालुक्याच्या शासकीय विश्रामगृहात आज आम आदमी पार्टीच्या वतीने पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .या वेळी
जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्याकडून प्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.जिल्हा समिती सदस्य परमजीत सिंग झगडे, विधी सल्लागार ऍड.किशोर पुसलवार, बलराम केसकर आणि विशाल माने यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.पक्ष प्रवेश कार्यक्रमाला
जिल्हा सचिव राज नगराळे, जिल्हा संघटन मंत्री शंकर अरोरा, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना दीपक बेरशेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. बल्लारपूरात पार पडलेल्या कार्यक्रमात अनेकांनी आम आदमी पार्टीत
पक्षप्रवेश केल्याचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

आम आदमी पार्टीची संघटन बांधणी व पक्ष प्रसाराविषयी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आगामी काळात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच गांव पातळीवर आम आदमी पार्टीची संघटन बांधनी मजबूत करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टी ही मजबूत संघटना म्हणून उभी राहिली असून, लोकहिताच्या विविध मुद्द्यांवर ही संघटना कार्यरत आहे. दिल्ली येथील आम आदमी पार्टी सरकारच्या धर्तीवरच लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणाऱ्या धोरणांना प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी आम आदमी पार्टी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे
कार्यक्रमाला जिल्हा समितीचे निलेश जाधव, शमशेर सिंग चव्हाण, विशाल माने यांच्या सह दीपक वाडके, नागेंद्र शर्मा, दिनेश जयस्वाल, आशिष गेडाम, सुमित ताकसांडे, शंकर अडवाणी, नवी पठाण, इरशाद शेख, अंकुश सुरतीकर, लव सुरवतीकर, देवा फुलकर, सोनू सय्यद, कालिदास जुनगरे, फिरोज शेख, अहमद शेख, आतिश वैरागडे, इमरान खान, संजय वर्मा, हेमंत ठाकरे, नाना माडमवार, अजय शिवाचे, बंडू मेश्राम, संजय ठाकरे, अर्जुन झांजोटे, सुमित झांजवटे, दत्ता घोणे, दिनेश आसटकर, सुरेश नाडमवार आदिं उपस्थित होते.