Home Breaking News • सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणांऱ्या ३२ रक्तदात्यांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान !...

• सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणांऱ्या ३२ रक्तदात्यांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान ! • चरुर धारापूरे या गावात पार पडला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम!

186

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

भद्रावती – तालुक्यातील चंदनखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चरुर धारापुरे येथील युवा कार्यकर्ता अमोल मुरलीधर दडमल , आदिवासी माना जमात संघटन व विद्यार्थी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या विवाह सोहळ्याचे
औचित्य साधत दि. २१ मे ला स्थानिक मानिका भवन येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच नयन जांभुळे यांच्या हस्ते पार पडले.आयोजित कार्यक्रमाला
दुर्गाताई केदार ,माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल हनवते , उपसरपंच भारती उरकांडे, ग्रामपंचायत सदस्य आशा नन्नावरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते,धर्मादास चौधरी, प्रकाश भरडे, नंदकिशोर जांभुळे, डॉ.हर्षल गणविर, डॉ.तुषार पायधान, डॉ.अमोल रामटेके, डॉ.आषिश कांबळे, डॉ, अभिषेक कुकडे, रुपेश घुमे आदिं प्रामुख्याने उपस्थित होते. चंदनखेडा या गांव परिसरातील ३२ रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने येवून रक्तदान केले नंतर रक्तदांत्याना लगेच वर वधू व आदिवासी माना जमात संघटन व विद्यार्थी युवा संघटना चरुर धारापुरे यांच्या कडुन सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देवुन सन्मानित करण्यात आले. सदरहु शिबिराला अरुणा चौधरी,निरंजना श्रीरामे, राहुल केदार,रुपेश केदार,अमर श्रीरामे, सचिन गजभे,समिर केदार, सौरभ दडमल, गायत्री श्रीरामे, पुजा गायकवाड,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट व शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा, बिरसा मुंडा क्रिडा मंडळ कोकेवाडा (मा.) विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ व चरुर धारापुरे येथील ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.