•चंद्रपूर जिल्हा परिषदचे सेवानिवृत्त लेखाधिकारी दीपक जेऊरकर यांचा सपत्निक सत्कार!
•सत्कार कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती
• राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या अनेक आंदोलनात जेऊरकरांची राहिली महत्वाची भुमिका!
चंद्रपूर :किरण घाटे
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने येथील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त लेखाधिकारी दिपक जेऊरकर यांचा सेवानिवृत्त निमित्ताने नुकताच सपत्निक सत्कार झाला.
नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सभागृहात दिपक जेऊरकर व त्यांच्या पत्नी रजनी जेऊरकर यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या वेळी त्यांना एक भेट वस्तुही देण्यात आली.
सत्कार समारंभाचे
अध्यक्षस्थान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाचे अशोक दगडे यांनी विभुषित केले होते तर विशेष अतिथी म्हणून विधान परीषद सदस्य, आ.सुधाकर अडबाले उपस्थित होते. या शिवाय प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार बुटे,
चंद्रपूर तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार राजु धांडे, ॲङ. विजय मोगरे, ज्ञानेश्वर महल्ले या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
आयोजित सत्कार समारंभात
हरीश ससनकर, रमेश कासुलकर , अजय टेप्पलवार, विपीन धाबेकर, अनुप भोयर आदिंनी दिपक जेऊरकर यांच्या प्रशासकीय कार्याची प्रशंशा केली तसेच त्यांच्या प्रती गौरोवोद्गार काढुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू धांडे यांनी केलें, सुत्र संचालन अविनाश बोरगमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत
कोतपल्लीवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत येवले, संदीप ठाकरे, अजय चहारे, शैलेश धात्रक, अजय मेकलवार, महेश पानसे, नितीन पाटील, सिमा पॉल, लीना जांभूळकर, रजनी आनंदे, भाग्यश्री श्रीरामे, किरण वैरागडे व सर्व जिल्हा शाखेच्या पदाधिका-यांनी अथक परिश्रम घेतले.
या पूर्वी झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात दीपक जेऊरकर यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.हे विशेष ! आज ही ते कर्मचारी वर्गात
लोकप्रिय आहे.⚪⬜
