Ballarpur taluka@ news
• रेती अभावी बांधकाम अडले -घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून द्या राजु झोडेंची मागणी तहसीलदारांना दिले निवेदन !
सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)
बल्लारपूर तालुक्यातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्राम विकास कृती समितीने केली असून तसे निवेदन तहसीलदारांना नुकतेच देण्यात आले आहे.शासनाकडून अनेकांना घरकुल मंजूर झाले आहेत, मात्र रेती अभावी बांधकाम रखडले असून अवैध रेती तस्करी करून चढ्या भावाने रेतीची बेभावपणे विक्री सुरू आहे.त्यामुळे घरकुल धारकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
बल्लारपूर तालुका व विसापूर गावातील काही भाजपचे कार्यकर्ते रेतीची अवैध तस्करी करत असून पाच ते सहा हजार रुपये ट्रॅक्टर प्रमाणे रेतीची विक्री करत आहेत.याबाबत तहसीलदार यांनी रेती तस्करांवर कारवाई करावी व घरकुल धारकांना रेती अल्प दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.तश्या आशयाचे एक निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.यावेळी राजु झोडे, संपत कोरडे, राजु लाडंगे,श्याम झिलपे,बळी नरूले, संजय सुर्यवंशी आदिं उपस्थित होते .