Home Breaking News Chandrapur taluka@ news • नव कोटी रुपयांतून तयार झालेल्या छोटी पडोली व...

Chandrapur taluka@ news • नव कोटी रुपयांतून तयार झालेल्या छोटी पडोली व विचोडा येथील गेटेड बंधाऱ्यांची आमदार किशोर जोरगेवारांनी केली पाहणी •शेकडों हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटेल ; भूजल पातळीत होणार वाढ!

92

Chandrapur taluka@ news
• नव कोटी रुपयांतून तयार झालेल्या छोटी पडोली व विचोडा येथील गेटेड बंधाऱ्यांची आमदार किशोर जोरगेवारांनी केली पाहणी

•शेकडों हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटेल ; भूजल पातळीत होणार वाढ!

चंद्रपूर -किरण घाटे

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर जलसंधारण विभागाने उपलब्ध करून दिलेल्या १२ करोड रुपयांच्या निधीतून विचोडा रयतवारी, जूनी पडोली, अंतुर्ला येथे बंधा-यांचे काम करण्यात आले आहे. दरम्यान आमदार जोरगेवार यांनी विचोडा रय्यतवारी आणि जुनी पडोली येथील बंधा-यांच्या कामाची पाहणी केली आहे. सदरहू काम पुर्ण झाले आहे. या बंध-यामुळे येथील शेकडों हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

यावेळी जुनी पडोलीचे उपसरपंच सुनिता नागरकर, भास्कर नागरकर, देवानंद नागरकर, दादाजी वाढई, नथ्थु वाडगुरे, विकास वाढई, ग्रामपंचायत सदस्य सुभाष आवळे, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, छोटा नागपूर उपसरपंच रिषभ दुपारे, प्रतिक्षा ठावरी, रंजुदेवी विश्वर्कमा, कुंटा वाघमारे, मुद्रीका कस्तुरे, गीता मासिरकर, संजय बोबडे, गणेश दिवसे, शोभा दिवसे, सविता बोबडे, ज्ञाणेश्वर पिंगे, पिंटु देवगडे, संदेश साव आदिंची उपस्थिती होती.

आरोग्य, शिक्षण आणि शेती या तिनही विषयांवर आमदार जोरगेवार यांचे विशेष लक्ष राहिले आहे. या क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी मोठा निधी खेचून आणला आहे. या अगोदर आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर तालुक्याला कापूस उत्पादक तालुका घोषीत केला आहे. तसेच सिएस टीपीएसच्या राखेमुळे शेतपिकांचे नुकसान होत होत होते. सदर राख नाल्यात जमा झाल्याने. सदर दुषीत राख शेतक-यांच्या शेतात जात होती. त्यामुळे आमदार जोरगेवार यांनी सदर नाल्याचे खोलीकरण करण्यात आले होते. परिणामी हा प्रश्न सुटला. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी आमदार जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. मोठा निधी या भागात आमदार जोरगेवार यांनी विविध विकासकामांसाठी खर्च केला आहे. विचोडा रयतवारी, जूनी पडोली, अंतुर्ला लगत असलेल्या गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी सदर तिन्हीही गावात गेटेड बंधारे तयार करण्यात यावेत अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली होती. अखेर या कामासाठी जलसंधारण विभागाने १२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता. या निधीतून या तीनही गावात बंधा-यांचे काम करण्यात आले आहे. दरम्यान आमदार जोरगेवार यांनी विचोडा रय्यतवारी आणि छोटी पडोली येथे भेट देत येथील बंधाऱ्यांची पाहणी केली. या बंधा-याचे काम पुर्ण झाले असून येथील शेकडों हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. तसेच या बंधा-यांमुळे विचोडा, जुनी पडोली, छोट नागपूर, अंबोरा खैरगाव, चांद सुर्ला, लखमापूर आदि गावे जुळल्या गेली आहे. बंधाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबदल विचोडा ग्रामपंचायत येथे आमदार जोरगेवार यांचा सत्कार करत गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

सदर काम उत्तम दर्जाचे झाले आहे. या बंधा-यामुळे गावक-यांना मोठा फायदा होणार आहे. सोबत येथे आणखी काम आपण करणार आहोत. असे यावेळी किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.